Ritesh Deshmukh : तो समज जाओ बुढापा आ गया है...., रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:56 IST2022-08-08T16:53:35+5:302022-08-08T16:56:14+5:30
रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनिलिया डिसूजा ( Genelia D'Souza) हे बॉलिवूडचं क्युट कपल. या कपलच्या अदांवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. होय, म्हणूनच दोघांचा व्हिडीओ आला रे आला की, तो व्हायरल होतो.

Ritesh Deshmukh : तो समज जाओ बुढापा आ गया है...., रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ
रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनिलिया डिसूजा ( Genelia D'Souza) हे बॉलिवूडचं क्युट कपल आहे. या कपलच्या अदांवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. होय, म्हणूनच दोघांचा व्हिडीओ आला रे आला की, तो व्हायरल होतो. इतकंच काय, आणखी असे व्हिडीओ बनवा, म्हणून लोक या जोडप्याकडे मागणी करतात. सध्या रितेश व जेनेलियाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला दाद द्यावीशी वाटेल.
रितेशने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला अहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. ‘जब अपनी ही बीवी से प्यार हो जाए...,’ असं कॅप्शन देत रितेशने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याच्यासोबत जेनेलिया सुद्धा दिसतेय.
जब अपनी ही बीवी से प्यार हो जाए...तो समज जाओ बुढापा आ गया है...., असं रितेश यात म्हणतो. जेनेलिया त्याचं हे वाक्य ऐकते. मग काय होतं? याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच. जेनेलिया रितेशला मारायला धावते. रितेशचा हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. अगदी 3 तासांत 1 लाखांवर लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. कमेंट्स तर विचारू नका. व्हिडीओवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत.
बुढापे का स्वागत, ये इश्क कयामत, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. सही पकडे है भाई, असं एका युजरने लिहिलं आहे. अनेकांनी रितेश व जेनेलियाचं कौतुक केलं आहे.
रितेश देशमुखने ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पाऊल टाकलं. याच सिनेमाच्या सेटवर रितेश जेनेलियाच्या प्रेमात पडला होता. पुढे दोघांनी लग्न केलं.