रब ने बना दी जोडी! जिनिलीया आणि रितेशचे Couple Goals, व्हिडिओ पाहून चाहते खूश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 11:36 IST2024-10-23T11:36:00+5:302024-10-23T11:36:33+5:30
मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनीही हजेरी लावली होती.

रब ने बना दी जोडी! जिनिलीया आणि रितेशचे Couple Goals, व्हिडिओ पाहून चाहते खूश
गणेशोत्सव आणि नवरात्रीनंतर आता दिवाळीचे वेध लागले आहेत. दरवर्षी बॉलिवूड सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. अनेक कलाकारांकडून दिवाळीसाठी खास पार्टीचं आयोजनही करण्यात येतं. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राही दरवर्षी दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करतो. यंदाही मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनीही हजेरी लावली होती. जिनिलीयाने डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. तर रितेश काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसून आला. रितेश-जिनिलीयाने पापाराझींना फोटोसाठी पोझही दिल्या. त्यांचा दिवाळी पार्टीतील एक व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूडच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.
नेहमीप्रमाणेच रितेश-जिनिलीयाने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी रितेश-जिनिलीयाचं कौतुक केलं आहे. "बॉलिवूडमधलं बेस्ट कपल", "सुंदर जोडी", "परफेक्ट जोडी" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. रितेश-जिनिलीया यांच्याकडे सिनेसृष्टीतील एक आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं.
२०१२ मध्ये रितेश-जिनिलीयाने लग्नबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांना दोन मुलं आहेत. तुझे मेरी कसम, वेड या सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. रितेश-जिनिलीया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.