"यंदाच्या दिवाळीला लातूरला गेलो नाही, कारण..." रितेश-जिनिलीयानं 'अशी' साजरी केली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:45 IST2025-10-23T09:45:05+5:302025-10-23T09:45:32+5:30

देशमुख कुटुंबाची मुंबईतील खास दिवाळी! रितेशने दोन्ही मुलांसोबत मिळून जिनिलियाचं केलं औक्षण

Riteish Genelia Deshmukh Celebrates Diwali Padwa 2025 In Mumbai Did Not Went To Latur Due To Raja Shivaji Movie Shooting | "यंदाच्या दिवाळीला लातूरला गेलो नाही, कारण..." रितेश-जिनिलीयानं 'अशी' साजरी केली दिवाळी

"यंदाच्या दिवाळीला लातूरला गेलो नाही, कारण..." रितेश-जिनिलीयानं 'अशी' साजरी केली दिवाळी

Riteish Genelia Deshmukh Celebrates Diwali Padwa 2025 : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचे कुटुंब दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने लातूरला जाऊन सण साजरा करतंं. मात्र, यंदा रितेश देशमुख त्याच्या महत्त्वाकांक्षी आगामी चित्रपट 'राजा शिवाजी' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे देशमुख कुटुंबाला लातूरला जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी रितेश आणि जिनिलिया यांनी मुंबईतील आपल्या घरीच अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला आणि त्याचे सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभ्यंगस्नानाची पारंपरिक पद्धत देशमुख कुटुंबाने मुंबईतही जपली. पाडव्याच्या दिवशी रितेश देशमुखने स्वतः दोन्ही मुलं रियान आणि राहिल यांना मोठ्या प्रेमाने उटणं लावून अभ्यंगस्नान घातले. यानंतर मुलांनी एकत्र येऊन सुंदर रांगोळी काढल्याचेही व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले.


जिनिलियाचं औक्षण
पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रितेश देशमुख आणि त्याची दोन्ही मुलं रियान आणि राहिल यांनी त्यांच्या घरच्या 'लक्ष्मी'चे म्हणजेच जिनिलिया देशमुखचं औक्षण केलं. या व्हिडीओमध्ये हा सुंदर क्षण पाहायला मिळाला. शेवटी, रितेश, जिनिलिया आणि दोन्ही मुलांनी एकत्र येऊन दिवाळी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

रितेशनं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, "दरवर्षी आम्ही दिवाळीचा सण आमच्या कुटुंबीयांबरोबर बाभळगाव लातूर येथे साजरा करतो. पण, यावर्षी 'राजा शिवाजी' सिनेमाचं शूटिंग सुरू असल्यामुळे आम्ही लातूरला जाऊ शकलो नाही. पण, आमच्या घरच्या परंपरा आम्हाला कायम लक्षात राहणार आहेत. यामुळेच आम्ही मुंबईत दिवाळी पाडवा साजरा केला. तुम्हा सर्वांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!! खूप प्रेम, देशमुख परिवार".

Web Title : रितेश और जेनेलिया ने फिल्म की शूटिंग के कारण मुंबई में दिवाली मनाई।

Web Summary : रितेश देशमुख और जेनेलिया देशमुख ने परिवार के साथ मुंबई में दिवाली पाड़वा मनाया। रितेश की 'राजा शिवाजी' की फिल्म शूटिंग के कारण वे लातूर की अपनी वार्षिक यात्रा से चूक गए। परिवार ने अभ्यंग स्नान और रंगोली जैसे पारंपरिक अनुष्ठान किए।

Web Title : Riteish and Genelia celebrate Diwali in Mumbai due to film shoot.

Web Summary : Riteish Deshmukh and Genelia Deshmukh celebrated Diwali Padwa in Mumbai with family. They missed their annual trip to Latur due to Riteish's 'Raja Shivaji' film shoot. The family performed traditional rituals like Abhyang Snan and rangoli.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.