रितेश देशमुख लोकांना माझे वडील मंत्री नसून शेतकरी असल्याचे सांगायचा, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 18:39 IST2017-09-26T12:21:22+5:302017-09-26T18:39:46+5:30

बॉलिवूडमध्ये बरेचसे असे स्टार आहेत, ज्यांचे आई-वडील खूप मोठे नामांकित व्यक्ती आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, करिष्मा कपूर, करिना कपूर, ...

Riteish Deshmukh told the people not to be my father's minister but a farmer, but why? | रितेश देशमुख लोकांना माझे वडील मंत्री नसून शेतकरी असल्याचे सांगायचा, पण का?

रितेश देशमुख लोकांना माझे वडील मंत्री नसून शेतकरी असल्याचे सांगायचा, पण का?

लिवूडमध्ये बरेचसे असे स्टार आहेत, ज्यांचे आई-वडील खूप मोठे नामांकित व्यक्ती आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, करिष्मा कपूर, करिना कपूर, रणबीर कपूर, सैफ अली खान आदींची नावे घेता येईल. याव्यतिरिक्त इंडस्ट्रीमध्ये असेही काही कलाकार आहेत, जे लहानपणी त्यांची खरी ओळख सांगण्यास घाबरायचे. ते चुकूनही सांगत नसायचे की, ते एका नामांकित कुटुंबात जन्माला आले आहेत. होय, असाच काहीसा किस्सा बॉलिवूड स्टार रितेश देशमुख याच्याविषयीचा आहे. रितेशनेच याबाबतचा एका टीव्ही टॉक शोमध्ये खुलासा केला आहे. ‘यादों की बारात’ या टीव्ही टॉक शोमध्ये रितेशने सांगितले होते की, ‘जेव्हा मी शाळेत होतो, तेव्हा मला नेहमीच विचारले जायचे की तुझे वडील काय करतात? अशात मी सांगायचो की, माझे वडील, एक शेतकरी आहेत. कारण मला माझे वडील मंत्री असल्याचे सांगताना विचित्र वाटायचे. त्यामुळे माझे नेहमीच उत्तर असायचे की, ते एक शेतकरी आहेत. 

आपली ओळख लपविणारा रितेश हा एकमेव अभिनेता नसून, दिग्दर्शक तथा निर्माता करण जोहरही यामधीलच एक होता. करणने सांगितले की, ‘ज्याठिकाणी आम्ही राहायचो त्याठिकाणी खूप श्रीमंत लोक राहायचे. त्याठिकाणी हिंदी चित्रपट कोणीही बघत नव्हते. त्यामुळे त्या भागातील लोक मोजक्याच स्टार्सना ओळखायचे. मात्र हिंदी चित्रपटांविषयी त्यांना काहीच माहिती नव्हती. करण जेव्हा हा सर्व किस्सा सांगत होता, तेव्हा साजिद खानने त्याला मध्येच विचारले की, तू अशा कोणत्या देशात राहत होता. त्यावर करणने म्हटले तो हाच देश आहे. ‘अशात मला स्वत:ची ओळख सांगताना खूप अवघड होत असायचे, असा खुलासाही करणने या शोमध्ये केला होता. 



असो, बॉलिवूडमध्ये स्वत:च्या हिमतीवर ओळख निर्माण करणारा अभिनेता रितेश देशमुख हा त्याच्या वडिलांच्या खूप क्लोज होता. दिवंगत विलासराव देशमुख महाराष्टÑ राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. शिवाय केंद्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी सांभाळली आहे. महाराष्टÑातील हेवीवेट नेते म्हणून त्यांची ओळख होती. रितेश जेव्हा चित्रपटसृष्टीत आला होता, तेव्हा विलासरावांचा मुलगा म्हणूनच त्याला ओळखले गेले. रितेश आजही त्याच्या वडिलांना खूप मिस करतो, हेही तेवढेच खरे आहे. 

Web Title: Riteish Deshmukh told the people not to be my father's minister but a farmer, but why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.