तब्बल ४० वर्षांनी रितेश देशमुख पोहोचला त्याच्या शाळेत, Video शेअर करत दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 10:05 IST2025-09-16T10:04:16+5:302025-09-16T10:05:14+5:30

रितेश देशमुखचं शालेय शिक्षण मुंबई, पुणे किंवा त्याच्या मूळ गावी लातूरमध्ये झालेलं नाही.

Riteish Deshmukh Reaches His School Sanjeewan Vidyalaya Panchgani After 40 Years Shares Video | तब्बल ४० वर्षांनी रितेश देशमुख पोहोचला त्याच्या शाळेत, Video शेअर करत दाखवली झलक

तब्बल ४० वर्षांनी रितेश देशमुख पोहोचला त्याच्या शाळेत, Video शेअर करत दाखवली झलक

Riteish Deshmukh Panchgani School Visit: अभिनेता रितेश देशमुख म्हणजे महाराष्ट्राचा लाडका 'भाऊ'. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा चिरंजीव आणि आपल्या अभिनयाने, दिग्दर्शनाने महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या मनात घर केलेला हा अभिनेता नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या एका ऐतिहासिक चित्रपटाच्या शूटिंगसाठी सातारा-महाबळेश्वर परिसरात आहे आणि याच निमित्ताने त्याच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्यात.

रितेश देशमुखचा जन्म जरी लातूरमधील बाभळगावी झाला असला, तरी त्याचे शालेय शिक्षण मुंबई-पुण्यात किंवा लातूरमध्ये झालेले नाही. त्याचे शिक्षण पाचगणीच्या संजीवन विद्यालय या शाळेत झाले आहे. नुकताच रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याच्या शाळेची झलक दिसून येतेय.

रितेशचं शिक्षण हे पाचगणीतील शाळेत पुर्ण झालाय. सोशल मीडियावर शाळेच्या परिसरातील व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं 'हॅशटॅग पाचगणी' असं लिहिलं आहे. रितेशनं या व्हिडीओवर "मी माझ्या शाळेच्या मैदानात ४० वर्षांनंतर गेलो…" असं भावनिक कॅप्शन दिलं आहे. यापुढे त्याने शाळेचं नाव आणि लोकेशन दिलं आहे. रितेशच्या शाळेचं नाव संजीवन विद्यालय असं आहे.


रितेशने बॉलिवूडमध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून पदार्पण केले आणि त्यानंतर अनेक यशस्वी चित्रपट दिले. अलिकडेच रितेश हा 'रेड २' आणि 'हाऊसफुल ५' मध्ये पाहायला मिळाला. आता चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता लागली आहे. रितेश लवकरच 'धमाल ४' (Dhamaal 4) मध्ये पाहायला मिळणार आहे. धमाल बॉलीवूडच्या त्या प्रसिद्ध कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक आहे, ज्यांचे पात्र कल्ट आहेत आणि प्रेक्षक आजही ते पाहताना एन्जॉय करतात


 

Web Title: Riteish Deshmukh Reaches His School Sanjeewan Vidyalaya Panchgani After 40 Years Shares Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.