VIDEO : लेग एक्सरसाइज के साईड इफेक्ट! रितेश देशमुखची अवस्था बिकट, चालणंही झालं मुश्किल !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 13:04 IST2022-07-12T13:03:12+5:302022-07-12T13:04:12+5:30

Riteish Deshmukh : रितेशने जिममधला एक्सरसाइज करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. लेग एक्सरसाईज करुन रितेशची रितेशची अवस्था बिकट झालीये.

Riteish Deshmukh leg exercise KE side effects funny reel VIRAL | VIDEO : लेग एक्सरसाइज के साईड इफेक्ट! रितेश देशमुखची अवस्था बिकट, चालणंही झालं मुश्किल !!

VIDEO : लेग एक्सरसाइज के साईड इफेक्ट! रितेश देशमुखची अवस्था बिकट, चालणंही झालं मुश्किल !!

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रितेशच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट, रिल्स पाहणं एक वेगळा आनंद आहे. पण सध्या रितेशची अवस्था बिकट झालीये. इतकी बिकट की त्याला चालणंही मुश्किल झालं आहे. हे कसं घडलं तर जिममधील पायांच्या अति व्यायामामुळे.  होय, हे सगळे ‘लेग एक्सरसाइजचे साईड इफेक्ट’

 रितेशने जिममधला एक्सरसाइज करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. लेग एक्सरसाईज करुन रितेशची हवा टाईट झालेली दिसतेय. वाचून घाबरलात ना? पण घाबरू नका. कारण नेहमीप्रमाणे या व्हिडीओमधूनही रितेशने चाहत्यांना हसवण्याचा प्रयत्न केला आहे.

होय, रितेशने इन्स्टाग्रामवर  एक नवा फिल्टर असलेला व्हिडीओ शेअर केला आहे. हा फिल्टर लावून शूट केलेला कोणताही व्हिडिओ किंवा रील तुम्हाला वेडंवाकडं हलवून टाकतो.  नॉर्मल स्थितीत शूट केलेला व्हिडिओ सुद्धा विचित्र पद्धतीने हलू लागतो. व्हिडीओत रितेश असाच वेडावाकडा हलतोय. ही सगळी याच फिल्टरची कमाल आहे. पायांचा व्यायाम जास्त केल्यावर चालताना त्रास होतोय, असा भास या व्हिडीओमुळे होतो आणि सोबत हसू आवरणं देखील कठीण होतं.  तुम्हाला आठवत असेलच की, काही दिवसांपूर्वी असा फिल्टर वापरून प्रार्थना बेहरेने सुद्धा विडिओ बनवला होता. 

रितेशच्या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ‘ये इन्स्टाग्राम के साईड इफेक्ट्स है भाऊ,’अशी कमेंट एकाने केली आहे. सारा बदल हिलेला, अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे. आमचे डोळे गेले कामातून, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. रितेश देशमुख लवकरच  दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. नुकतंच त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ या   सिनेमाचं शूटिंग संपलं.  

Web Title: Riteish Deshmukh leg exercise KE side effects funny reel VIRAL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.