'बॉर्डर २' पाहण्यासाठी रितेश देशमुखनं अहान शेट्टी समोर ठेवली 'ही' अट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:33 IST2026-01-22T14:32:21+5:302026-01-22T14:33:18+5:30

नेहमीच नवनवीन ट्रेंड फॉलो करणाऱ्या रितेश देशमुखने एक रील शेअर केली आहे.

Riteish Deshmukh Follows Ahan Shetty Border 2 Comment Trend Instagram Reel | 'बॉर्डर २' पाहण्यासाठी रितेश देशमुखनं अहान शेट्टी समोर ठेवली 'ही' अट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...

'बॉर्डर २' पाहण्यासाठी रितेश देशमुखनं अहान शेट्टी समोर ठेवली 'ही' अट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...

Riteish Deshmukh to Ahan Shetty : सोशल मीडियावर सध्या 'बॉर्डर २' या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. 'बॉर्डर २' या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशातच अहानच्या नावानं एक अनोखा ट्रेंड आता सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. "जर अहान शेट्टीनं कमेंट केली, तर मी चित्रपट पाहायला जाईल", "जर अहान शेट्टीनं कमेंट केली, तर मी बॉर्डर २ दोनदा पाहेन", अशा प्रकारच्या अनेक रील्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, अहान शेट्टी या प्रत्येक रीलला स्वतःहून उत्तर देत आहे, ज्यामुळे हा ट्रेंड तुफान व्हायरल झाला आहे. सामान्य नेटकऱ्यांपासून सुरू झालेला हा ट्रेंड आता सेलिब्रिटींपर्यंत पोहोचला आहे. अभिनेता रितेश देशमुख यानेही या ट्रेंडचा भाग होत एक मजेशीर रील शेअर केली आहे.

नेहमीच नवनवीन ट्रेंड फॉलो करणाऱ्या रितेश देशमुखने एक रील शेअर केली आहे. यात तो गाडीतून प्रवास करताना दिसतोय.  त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "माझ्या रीलवर अहान शेट्टीच्या कमेंटची वाट पाहतोय. अहानने कमेंट केली, तर मी लगेच 'बॉर्डर २' चे तिकीट बुक करेन. अहान लवकर कमेंट कर, मी चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे". 

रितेशच्या या पोस्टवर आता अहाननं कमेंट करत लिहलं, "हाहाहा, खूप खूप प्रेम सर. तुम्ही नेहमीच मला निस्वार्थपणे पाठिंबा दिलात आणि हा आधार मी या संपूर्ण प्रवासात कायम सोबत ठेवेन. मनापासून खूप आभार". अहान याने कमेंट करताच रितेशनं त्याला प्रतिक्रिया देत लिहलं, "आता लगेचच तिकीट बुक करतोय
खूप प्रेम माझ्या छोट्या भावा, ब्लॉकबस्टर येतोय…".


ट्रेंडची सुरुवात कशी झाली? 
अहान शेट्टीने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ट्रेंडची सुरुवात कशी झाली? याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, "कोणीतरी रील बनवली होती की, अहानने कमेंट केली तर मी माझ्या पगारातून मित्रांना चित्रपट दाखवेन. मला ते इतकं आवडलं की मी त्यावर कमेंट केली, 'तुम्ही पैसे खर्च करू नका, तुमच्या कुटुंबाची तिकीटं मी देईन'. तिथूनच हे सगळं सुरू झालं". दरम्यान, रितेशच्या आधी क्रिकेटर के. एल. राहुलनेही हा ट्रेंड फॉलो केला होता.

'बॉर्डर २' उद्याच होणार प्रदर्शित
 'बॉर्डर २' उद्या म्हणजेच २३ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अहान शेट्टीसोबत सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, मेधा राणा आणि मोना सिंग यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.

Web Title : रितेश देशमुख ने अहान शेट्टी अभिनीत 'बॉर्डर 2' देखने के लिए रखी शर्त

Web Summary : रितेश देशमुख 'बॉर्डर 2' ट्रेंड में शामिल हुए, उन्होंने कहा कि अगर अहान शेट्टी उनकी रील पर टिप्पणी करेंगे तो वह फिल्म देखेंगे। अहान ने जवाब दिया, और रितेश ने अपनी टिकट बुक कर ली। यह ट्रेंड तब शुरू हुआ जब अहान ने फिल्म के बारे में रील बनाने वाले किसी व्यक्ति के लिए टिकट खरीदने की पेशकश की। 'बॉर्डर 2' 23 जनवरी, 2026 को रिलीज हो रही है।

Web Title : Riteish Deshmukh's condition for watching 'Border 2' starring Ahan Shetty.

Web Summary : Riteish Deshmukh joined the 'Border 2' trend, saying he'll watch the film if Ahan Shetty comments on his reel. Ahan responded, and Riteish booked his ticket. The trend started when Ahan offered to buy tickets for someone who made a reel about the film. 'Border 2' releases January 23, 2026.