लग्नाच्या दिवशी रितेश देशमुख ८ वेळा पडला होता जिनिलियाच्या पाया, वाचा हा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:03 IST2024-12-19T10:03:03+5:302024-12-19T10:03:38+5:30

Riteish Deshmukh-Genelia D'souza Deshmukh : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहेत, चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या लग्नाशी संबंधित रंजक किस्सा.

Riteish Deshmukh fell at Genelia's feet 8 times on the wedding day, read this story | लग्नाच्या दिवशी रितेश देशमुख ८ वेळा पडला होता जिनिलियाच्या पाया, वाचा हा किस्सा

लग्नाच्या दिवशी रितेश देशमुख ८ वेळा पडला होता जिनिलियाच्या पाया, वाचा हा किस्सा

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia D'souza-Deshmukh) हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहेत. नऊ वर्षांच्या डेटिंगनंतर या जोडप्याने २०१२ मध्ये लग्न केले आणि ते दोन मुलांचे पालक आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या जोडीवर अधिक प्रेम करतात आणि त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. नुकतेच रितेशच्या वाढदिवशी त्याची पत्नी जिनिलियाने एका पोस्टमध्ये लिहिले होते की, अभिनेता केवळ एक अद्भुत पिता, मुलगा, मित्रच नाही तर तो एक उत्तम नवरा देखील आहे. आज आम्ही तुम्हाला या जोडप्याच्या महाराष्ट्रीयन लग्नात रितेशने आपल्या पत्नीच्या पायाला ८ वेळा का स्पर्श केला हे सांगणार आहोत.

एकदा, जिनिलिया आणि रितेश 'शादी स्पेशल' एपिसोडसाठी सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये दिसले. यावेळी माहीच्या एका परफॉर्मन्सदरम्यान, अभिनेत्री खूप भावुक दिसली आणि यादरम्यान तिने सांगितले की तिला तिचे लग्न आठवले. जिनिलियाने तिच्या लग्नाबद्दल एक अनोखी विधी शेअर केला आणि तिने सांगितले की त्यांच्या लग्नाच्या एका विधीदरम्यान रितेशला परंपरेनुसार आठ वेळा तिच्या पायांना स्पर्श करावा लागला.

सासरी जाताना जिनिलिया झाली होती भावुक 
याबद्दल पुढे बोलताना जिनिलिया म्हणाली, 'आमचे पारंपारिक महाराष्ट्रीय लग्न झाले होते आणि त्यादरम्यान रितेशला माझ्या पायाला ८ वेळा स्पर्श करावा लागला आणि हे आश्चर्यकारक होते. ते पितृसत्ताक नियमांनाही आव्हान देते.' जिनिलिया पुढे म्हणाली की, आधुनिक विवाह हे एखाद्या पार्टीसारखे असतात. पारंपारिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले, निरोप देताना ती भावुक झाल्याचा खुलासा केला.

जिनिलिया आणि रितेशची लव्हस्टोरी
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख पहिल्यांदा २००३ मध्ये तुझे मेरी कसमच्या सेटवर एकमेकांना भेटले आणि नऊ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न झाले. लवकरच, जिनिलियाचे कुटुंब रियान आणि राहिलच्या आगमनाने पूर्ण झाले.

Web Title: Riteish Deshmukh fell at Genelia's feet 8 times on the wedding day, read this story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.