Guess Who : या फॅमिली फोटोतील बाबांच्या मांडीवर बसलेल्या अभिनेत्याला ओळखलंत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 18:08 IST2023-04-13T18:08:14+5:302023-04-13T18:08:22+5:30
Celebrity Childhood Photos: सध्या कलाकारांच्या बालपणीचे फोटो शेअर करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Guess Who : या फॅमिली फोटोतील बाबांच्या मांडीवर बसलेल्या अभिनेत्याला ओळखलंत?
सध्या सोशल मीडियावर कलाकारांच्या बालपणीचे फोटो शेअर करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोतील अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत?
फोटोत अभिनेता, त्याचे आई बाबा आणि दोन भावंडं असं सगळं कुटुंब एकत्र दिसतंय. अभिनेत्याचे दोन्ही भाऊ सध्या राजकारण आणि समाजकारणात सक्रीय आहेत. अभिनेत्याचे वडील आज या जगात नाहीत. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. इतक्या हिंटवरून तुम्ही फोटोतील अभिनेता कोण हे ओळखलं असणारच....
अद्यापही तुम्ही त्याला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. तो अन्य कुणी नसून महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमधील फॅमिली ही अभिनेता रितेश देशमुखची फॅमिली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्यांची पत्नी, मुलगा धीरज, अमित आणि रितेश देशमुख फोटोमध्ये दिसत आहेत. अभिनेता रितेश देशमुख त्याच्या वडिलांच्या म्हणजेच विलासराव देशमुख यांच्या मांडीवर बसला आहे.
वडील राजकारणात असताना रितेशने स्वत:साठी वेगळी वाट निवडली. त्याने अभिनेता व्हायचं ठरवलं. 'तुझे मेरी कसम' सिनेमातून त्यानं पदार्पण केलं. या चित्रपटात जिनिलिया देशमुख त्याची हिरोईन होती. हीच जिनिलिया पुढे रितेशची जोडीदार बनली. दोघांच्या लग्नाला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झालीत. दोघांना रिआन आणि राहील अशी दोन मुलं आहे. नुकताच दोघांचा वेड हा मराठी सिनेमा देखील रिलीज झाला. हा सिनेमा तुफान चालला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने बक्कळ कमाई केली.