​ऋषी कपूर यांचा गेला ‘तोल’; मुलगा रणबीर कपूरला मागावी लागली माफी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 05:32 AM2018-01-12T05:32:36+5:302018-01-12T11:02:36+5:30

ऋषी कपूर यांचा ‘तोल’ कधी जाईल, सांगता यायचे नाही. होय, कुठल्याही कारणाने त्यांचा पारा भडकू शकतो. अगदी एखाद्या चाहत्याने ...

Rishi Kapoor's 'Tol'; Son Ranbir Kapoor asks for forgiveness! | ​ऋषी कपूर यांचा गेला ‘तोल’; मुलगा रणबीर कपूरला मागावी लागली माफी!

​ऋषी कपूर यांचा गेला ‘तोल’; मुलगा रणबीर कपूरला मागावी लागली माफी!

googlenewsNext
ी कपूर यांचा ‘तोल’ कधी जाईल, सांगता यायचे नाही. होय, कुठल्याही कारणाने त्यांचा पारा भडकू शकतो. अगदी एखाद्या चाहत्याने सेल्फीसाठी विनंती केली तरीही. होय, अलीकडे नेमके हेच घडले.
अगदी काल परवा ऋषी कपूर आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या वांद्रे भागातील एका हॉटेलात डिनरसाठी पोहोचले. पत्नी नीतू सिंग, मुलगा रणबीर कपूर, मुलगी रिद्धिमा आणि नात असे सगळेच यावेळी त्यांच्यासोबत होते. या फॅमिली गेट टू गेदरचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ऋषी कपूर व फॅमिली वांद्रयाच्या या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले तेव्हा अख्खे रेस्टॉरंट खचाखच भरलेले होते. अशात अचानक रेस्टॉरंटमध्ये ऋषी कपूर, रणबीर कपूर असे सगळे आलेले पाहून लोकांना आश्चर्याचा  धक्का बसला नसेल तर नवल.



कपूर फॅमिलीचे डिनर एन्जॉय करून झाल्यावर एक फिमेल फॅन त्यांच्या टेबलजवळ गेली आणि सर्वांसोबत एक सेल्फी मिळावी म्हणून विनंती करू लागली. यावर रणबीर कपूर व नीतू सिंग या मायलेकांनी तर तिच्यासोबत सेल्फी क्लिक केली. पण ऋषी कपूर यांनी स्पष्ट नकार दिला. डिनर संपवून ऋषी कपूर जायला निघाले तेव्हा त्या फिमेल फॅनने पुन्हा एकदा त्यांच्याजवळ जात सेल्फीसाठी आग्रह धरला. पण याहीवेळी ऋषी कपूर यांनी नकार दिला. त्यांचा हा नकार बघून फिमेल फॅनने ‘हाऊ रूड’ अशी प्रतिक्रिया दिली. मग काय? तिचे ते ‘हाऊ रूड’ ऐकून ऋषी कपूरचा पारा भडकला. इतका की, त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी तिथेच त्या महिला चाहतीला फैलावर घ्यायला सुरुवात केली. हा वाद काही क्षणातचं इतका वाढला की, रणबीर कपूर मध्ये पडला अन् त्याने कसेबसे त्या महिला चाहतीला पापांच्या रागापासून वाचवले. एवढेच नव्हे तर त्या चाहतीची व्यक्तिश: माफीही मागितली.

ALSO READ : ​‘सर, थोड़ी कम लगाया करोे...’! पीओकेवरील ट्विटनंतर चाहत्यांचा ऋषी कपूर यांना सल्ला!!

काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर मीडियावरही असेच ओरडले होते. आपल्या वादग्रस्त टिष्ट्वटमुळेही ते कायम चर्चेत असतात.

Web Title: Rishi Kapoor's 'Tol'; Son Ranbir Kapoor asks for forgiveness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.