या उपचारांसाठी संयम लागतो आणि माझ्यात तोच नाही...! आजारपणावर बोलले ऋषी कपूर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 14:23 IST2019-01-27T14:22:39+5:302019-01-27T14:23:26+5:30
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असलेले अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजाराबद्दल वेगवेगळी चर्चा सुरु असताना प्रथमच खुद्द ऋषी कपूर यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

या उपचारांसाठी संयम लागतो आणि माझ्यात तोच नाही...! आजारपणावर बोलले ऋषी कपूर!!
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असलेले अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजाराबद्दल वेगवेगळी चर्चा सुरु असताना प्रथमच खुद्द ऋषी कपूर यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
होय, बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूर प्रथमचं आपल्या आजाराबद्दल बोलले. माझ्या तब्येतीत आधीपेक्षा बरीच सुधारणा आहे. मी आणखी काही दिवस कामावर परतू शकणार नाही. उपचार अद्यापही सुरु आहेत. या आजारापणातून लवकरचं बाहेर येईल, अशी आशा करतो. परमेश्वराची कृपा राहिली तर लवकरच कामावरही परतेल, असे ऋषी कपूर म्हणाले. माझा उपचार प्रचंड थकवणारा आणि दीर्घकाळ चालणारा आहेत. यासाठी संयम लागतो आणि दुदैवाने माझ्या स्वभावात तोच नाही, असेही ते म्हणाले.
मध्यंतरी ऋषी कपूर यांनाही कॅन्सरने ग्रासल्याची चर्चा होती. अर्थात कपूर कुटुंबाने लगेच ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत या बातमीचे खंडन केले होते. पण अलीकडे नीतू यांच्याच एका पोस्टनंतर पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. न्यु ईअर सेलिब्रेशनचा एक फोटो नीतू सिंग यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला होता. या फोटोला त्यांनी दिलेले कॅप्शन बरेच ‘सूचक’ होते.
‘नवीन वर्षांचा काहीच संकल्प नाही. केवळ प्रदूषण कमी होऊ देत. आशा आहे की, भविष्यात ‘कॅन्सर’ हे फक्त एका राशीचेचं नाव असेल. गरिबी कमी होऊ आणि भरपूर प्रेम व सुदृढ आरोग्य लाभू दे...’, असे नीतू सिंग यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले होते. नीतू सिंग यांची ही पोस्ट वाचून ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही ना? असा प्रश्न पुन्हा एकदा चाहत्यांना पडला होता.