ऋषी कपूर यांनी केली पोलखोल; म्हटले, ‘इंडस्ट्रीतील बºयाचशा स्टार्सला अभिनय करता येत नाही’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 14:31 IST2018-03-15T09:00:54+5:302018-03-15T14:31:23+5:30
बॉलिवूडमधील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या अशाच ...
.jpg)
ऋषी कपूर यांनी केली पोलखोल; म्हटले, ‘इंडस्ट्रीतील बºयाचशा स्टार्सला अभिनय करता येत नाही’!
ब लिवूडमधील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या अशाच काहीशा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. होय, यावेळी चिंटू अंकल अर्थात ऋषी कपूरने इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, इंडस्ट्रीत असे बरेचसे कलाकार आहेत ज्यांना अजिबातच अभिनय येत नाही. तुमच्या माहितीसाठी ऋषी कपूर नेहमीच त्यांचे म्हणणे अतिशय संतापाच्या भरात मांडत असतात. या कारणामुळे बºयाचदा ते सोशल मीडियात ट्रोल झाले आहेत. मात्र अशातही ते नेहमीच आपले म्हणणे याच अंदाजात मांडत आले आहेत.
नुकतेच एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान ऋषी कपूर यांनी म्हटले की, ‘इंडस्ट्रीत बरेचसे असे स्टार्स आहेत, ज्यांना अभिनयाचा अजिबातच गंध नाही.’ या मुलाखतीत जेव्हा त्यांना इंडस्ट्रीतील बदललेल्या वातावरणाबद्दल विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘नेहमीपासूनच मला वाटते की, चित्रपटाचा स्क्रीनप्लेच आत्मा आहे. त्यामुळे मी बºयाचशा अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे, जे कॉन्टेंटवर आधारित आहेत. ऋषी कपूर यांच्या या चित्रपटांमध्ये ‘दामिनी’ आणि ‘प्रेमरोग’ या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना अभिनयाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी म्हटले की, ‘चित्रपटसृष्टीत बरेचसे असे कलाकार आहेत, ज्यांना अभिनय येत नाही.’
यावेळी ऋषी कपूर यांनी ‘हिंदी मीडियम’ आणि ‘शुभ मंगल’ या चित्रपटांचेही कौतुक केले. यावेळी जेव्हा ऋषी यांना हिंदी चित्रपटांच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाणे अन् अवॉर्ड न जिंकण्यावरून विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, माझ्या फिल्म फेस्टिव्हल इंडस्ट्रीसाठी फारसे महत्त्वपूर्ण नाही. बॉलिवूडमध्ये चित्रपटांची निर्मिती प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी केली जाते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, ऋषी कपूर लवकरच महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘१०२ नॉट आउट’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. त्यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.