बॉलिवूडचे एका मागोमाग निखळले दोन तारे, त्यांचा हा फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 14:15 IST2020-04-30T14:15:02+5:302020-04-30T14:15:32+5:30
इरफान खान व ऋषी कपूर यांचा एक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

बॉलिवूडचे एका मागोमाग निखळले दोन तारे, त्यांचा हा फोटो होतोय व्हायरल
बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच्या अकाली झालेल्या निधनाच्या धक्क्यातून बॉलिवूडकर अद्याप सावरले नसताना आज सकाळी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. एका मागोमाग एक अशा हरहुन्नरी कलाकार हरपल्यामुळे बॉलिवूडला खूप मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसोबत इरफान खान व ऋषी कपूर यांचे चाहते खेद व्यक्त करत आहेत. त्यांच्या आठवणींना सोशल मीडियावर उजाळा देत आहे. दरम्यान इरफान खान व ऋषी कपूर यांचा एक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.
सोशल मीडियावर इरफान खान व ऋषी कपूर यांचा चर्चेत आलेला फोटो त्यांच्या डी डे चित्रपटातील असून दोघेही कारमध्ये मागच्या सीटवर बसलेले दिसत आहेत. इरफान खान आणि ऋषी कपूर सध्या एकाच प्रवासात असल्याचे जणू काही या फोटात दिसत असल्याचे चाहते फोटो शेअर करून म्हणत आहेत.
ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी निखील आडवाणी दिग्दर्शित ‘डी-डे’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमपासून प्रेरित भूमिका निभावली होती.
तर इरफान खानने रॉ एजंटची भूमिका केली होती. या चित्रपटात अर्जून रामपाल, हुमा कुरेशी आणि श्रुती हसनदेखील प्रमुख भूमिकेत होते.
इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या अशा अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअऱ केल्या जात आहेत.