रिना रॉयला दिग्दर्शकांनी असे काही सुनावले, ज्यामुळे सेटवरच त्यांना रडू कोसळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 21:41 IST2017-12-28T16:11:37+5:302017-12-28T21:41:37+5:30

गेल्या जमान्याची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रिना रॉय ७ जानेवारी २०१८ रोजी आपला ६१वा वाढदिवस साजरा करीत आहे. रिना रॉयने बॉलिवूडमध्ये ...

Rina Rooney's director said such things, which resulted in their tears on the set! | रिना रॉयला दिग्दर्शकांनी असे काही सुनावले, ज्यामुळे सेटवरच त्यांना रडू कोसळले!

रिना रॉयला दिग्दर्शकांनी असे काही सुनावले, ज्यामुळे सेटवरच त्यांना रडू कोसळले!

ल्या जमान्याची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रिना रॉय ७ जानेवारी २०१८ रोजी आपला ६१वा वाढदिवस साजरा करीत आहे. रिना रॉयने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. रिना रॉय यांनी बॉलिवूडमध्ये १९७२ मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक बी. आर. इशारा यांच्या ‘जरूरत’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. वास्तविक रिना यांनी बी.आर. इशारा यांच्याच ‘नई दुनिया नए लोग’ या चित्रपटाच्या शूटिंगला ‘जरूरत’ अगोदर सुरुवात केली होती. परंतु हा चित्रपट १९७३ मध्ये रिलीज झाला. आज आम्ही याच चित्रपटाशी संबंधित एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. होय, जेव्हा या चित्रपटादरम्यान रिना रॉय यांना दिग्दर्शक बी.आर. इशारा यांच्या रागाचा सामना करावा लागला, तेव्हा सेटवरच त्यांच्या डोळ्यात अश्रूधारा आल्या होत्या. 

हा किस्सा बी.आर. इशारा यांच्या ‘नई दुनिया नए लोक’ या शूटिंगदरम्यानचा आहे. हा रिना रॉय यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात रिनासोबत अभिनेता डॅनी डेन्जोंगपा हादेखील नवीन होता. या चित्रपटाची शूटिंग बंगळुरूपासून जवळपास ५० मैल दूर एका जंगलात सुरू होती. मात्र शूटिंगदरम्यानच रिना यांच्याकडून एक घोडचूक झाली. मात्र ही चूक दिग्दर्शकांना सहन झाली नाही. त्यांनी रिनाला असे काही खडेबोल सुनावले की, त्यांच्या डोळ्यातून सेटवरच अश्रूधारा वाहू लागल्या. 

त्याचे झाले असे की, रेल्वे लाइनसमोर एक सीन शूट केला जात होता. बॅकग्राउंडमध्ये ट्रेन जात असताना रिना रॉय यांना अभिनेता सत्येनच्या डोळ्यात डोळे घालून डायलॉग बोलायचा होता. दिग्दर्शक बी.आर. इशारा यांनी हा सीन शूट करण्याअगोदरच रिनाला जवळ बोलावित हा सीन एका टेकमध्येच शूट करावा लागेल, असे सांगितले. तसेच जर एका टेकमध्ये सीन शूट झाला नाही तर, आपल्याला दुसºया दिवसाची प्रतीक्षा करावी लागेल याची जाणीवही करून दिली. मात्र जे घडायचे नव्हते तेच घडले. रिनाकडून घोडचूक झाल्याने हा सीन त्या दिवशी शूट करता आला नाही. त्यामुळे दिग्दर्शकाचा प्रचंड संताप झाला. त्याचबरोबर संपूर्ण टीमला शहरात येण्या-जाण्याचा खर्चही भरावा लागला. 

Web Title: Rina Rooney's director said such things, which resulted in their tears on the set!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.