​रिमी सेनचा भाजपामध्ये प्रवेश: उत्तर प्रदेशात करणार निवडणूक प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 21:13 IST2017-01-24T15:43:35+5:302017-01-24T21:13:35+5:30

देशात सध्या निवडणूकीचे वारे वाहत असतानाच अभिनेत्री रिमी सेन हिने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

Rimi Sen enters BJP: Election campaigning in Uttar Pradesh | ​रिमी सेनचा भाजपामध्ये प्रवेश: उत्तर प्रदेशात करणार निवडणूक प्रचार

​रिमी सेनचा भाजपामध्ये प्रवेश: उत्तर प्रदेशात करणार निवडणूक प्रचार

शात सध्या निवडणूकीचे वारे वाहत असतानाच अभिनेत्री रिमी सेन हिने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे प्रभावित होऊन भाजपात प्रवेश करणार असल्याचे रिमी सेन हिने सांगितले. मात्र आगामी पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिचा भाजपा प्रवेश केला असून ती उत्तर प्रदेश, गोवा आणि पंजाबमधील आगामी निवडणुकीत प्रचार करणार असल्याचे सांगण्यात येते. 

प्रियदर्शन यांच्या ‘हंगामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाºया रिमी सेन हिने अनेक बड्या कलावंतासोबत काम केले मात्र तिचे बॉलिवूड करिअर फार छोटे ठरले. २०१५ साली प्रसारित झालेल्या ‘बिग बॉस’मध्ये ती सहभागी झाली होती त्यानंतर ती चित्रटात दिसली नाही. दरम्यान रिमीने ‘बुधिया सिंग- बॉर्न टू रन’ या चित्रपटाची निर्मिती केली. तिने काही दाक्षिणात्य सिनेमातही काम केले होते. Read More : ​बिग बॉस स्पर्धक नोरा फतेहीचा बिकनी अवतार



निवडणूकीच्या काळात रिमी सेनने केलेला भाजपा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. अभिनेता अर्जुन रामपाल व जॅकी श्रॉफ हे भाजपासाठी उत्तर प्रदेशात प्रचार करणार आहेत. या दोघांसोबत रिमी सेन निवडणूकीचा प्रचार करताना दिसू शकते असा अंदाज लावला जात आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची असल्याने पक्ष नवी रणनीती आखत असल्याचे सांगण्यात येते. Read More : ​सलमान खानचा कापला अहिल शर्माने पत्ता, अहिल बनणार बिग बॉसचा नवा होस्ट

मूळ पश्चिम बंगालची असलेल्या रिमीने हिंदीसह तेलुगू व बंगाली चित्रपटात काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाच्या प्रेरणेमुळे भाजपात आल्याची प्रतिक्रिया रिमीने दिली आहे. जी जबाबदारी पक्ष देईल, ती सांभळणार असल्याचे तिने सांगितले. रिमी सेनने हंगामा, भागमभाग, धूम, गरम मसाला, क्यूंकी आणि गोलमाल: फन इनलिमिडेट आणि फिर हेराफेरी सारख्या चित्रपटात काम केली आहे. अजय देवगण, सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत तिने केलेले चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. 

ALSO READ 
​अमित सध सांगतोय, बिग बॉस ठरला करियरचा टर्निंग पॉईंट
बिग बॉस : मनवीर गुर्जरला मिळाले ग्रॅण्डफिनालेचे तिकीट

Web Title: Rimi Sen enters BJP: Election campaigning in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.