रिमा लागू यांनी बदलले सासू-सूनेच्या नात्याचे संदर्भ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 11:22 IST2017-05-18T05:52:01+5:302017-05-18T11:22:01+5:30
मोठ्या पडद्यावर कधी सलमान खान तर कधी माधुरी दीक्षितच्या आईची भूमिका साकारणाºया रिमा लागू आज आपल्यात नाहीत. बॉलिवूडची आई ...

रिमा लागू यांनी बदलले सासू-सूनेच्या नात्याचे संदर्भ!
म ठ्या पडद्यावर कधी सलमान खान तर कधी माधुरी दीक्षितच्या आईची भूमिका साकारणाºया रिमा लागू आज आपल्यात नाहीत. बॉलिवूडची आई यासोबतच छोट्या पडद्यावर ‘तू तू मैं मैं’ करणारी एक सासू अशीच रिमा लागू यांची ओळख राहिली. त्यांनी कधीच स्वत:ला एका पठडीत बांधून ठेवले नाही. वेगवेगळ्या भूमिका त्यांनी जिवंत केल्या. अलीकडे आलेल्या ‘नामकरण’ या टीव्ही मालिकेत नकारात्मक भूमिका साकारून त्यांनी सर्व लोकप्रीय लेडी विलेनला मागे सोडले. अर्थात आई आणि सासू याच भूमिकांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली.
बॉलिवूडची आई
![]()
रिमा लागू यांनी मराठी, हिंदी अशा गाजलेल्या सिनेमांत भूमिका साकारल्या. पण सलमान खान व शाहरूख खान याच्या आईच्या रूपात त्यांना प्रचंड लोकप्रीयता मिळाली. यानंतर बॉलिवूडची आई अशीच जणू त्यांची ओळख झाली.
पहिला टीव्ही शो
![]()
१९८५ मध्ये ‘खानदान’ या मालिकेतून त्यांनी आपला पहिला टीव्ही डेब्यू केला होता.
पहिली आईची भूमिका
![]()
१९८८ मध्ये त्यांनी आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. आमिर खान याच्या गाजलेल्या ‘कयामत से कयामत तक’मध्ये त्या जुही चावलाच्या आईच्या भूमिकेत झळकल्या. ही त्यांनी बॉलिवूडमध्ये साकारलेली पहिली आईची भूमिका होती.
नवी ओळख
![]()
१९९४ मध्ये आलेल्या ‘श्रीमान और श्रीमती’ या टीव्ही शोने रिमा लागू यांना एक ओळख मिळाली. या यादगार अशा मालिकेत त्यांनी कोकीची तेवढीच यादगार भूमिका साकारली होती.
बदलली सासू - सूनेच्या नात्याची व्याख्या
![]()
‘तू तू मैं मैं’ या मालिकेत रिमा लागू यांनी साकारलेली सासूची भूमिका अविस्मरणीय अशीच आहे. या मालिकेतील सासू-सूनेच्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकलीत. सन २००० मधील हा सर्वाधिक लोकप्रीय शो बनला होता. यासाठी रिमा यांना बेस्ट कॉमेडियनचा पुरस्कारही मिळाला. रिमा यांना टीपिकल सासू-सूनेच्या कथांमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. त्यांचा फोकस एकच होता. काहीतरी वेगळे करत राहायचे. कदाचित म्हणूनच सांस बहू ड्रामाचे दिवस आल्यावर त्यांनी छोट्या पडद्यावरून काढता पाय घेतला.
कमबॅकने सगळ्यांना दिला धक्का
![]()
महेश भट्ट यांच्या ‘नामकरण’ या हिंदी मालिकेद्वारे रिमा लागू तब्बल आठ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतल्या होत्या. यात त्या नकारात्मक भूमिकेत होत्या. त्यांच्या या कमबॅकनंतरच्या नकारात्मक भूमिकेने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.