"तिने आजीला ढकललं नाही...", लेकीला ट्रोल करणाऱ्यांना रिद्धिमा कपूरचं थेट उत्तर; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:59 IST2025-02-25T08:58:12+5:302025-02-25T08:59:52+5:30
रिद्धिमा कपूरने केला लेकीचा बचाव, म्हणाली, "समाराने कोणालाही ढकललं नाही, उलट ती..."

"तिने आजीला ढकललं नाही...", लेकीला ट्रोल करणाऱ्यांना रिद्धिमा कपूरचं थेट उत्तर; म्हणाली...
बीटाऊनमध्ये कपूर कुटुंबाची नेहमीच चर्चा असते. नुकतंच रीमा जैनयांचा मुलगा आदर जैन लग्नबंधनात अडकला. आदर हा रणबीर कपूर, करीना कपूर यांचा आतेभाऊ आहे. त्याच्या लग्नात अख्खं कपूर कुटुंब आलं होतं. रणबीर कपूर पत्नी आलियासोबत दिसला. तर नीतू कपूर (Neetu Kapoor) या त्यांची लेक रिद्धिमा कपूर साहनी (Riddhima Kapoor Sahni) आणि नात समारा (Samara)सोबत पापाराझींसमोर पोज देताना दिसल्या. छोटी समारा कॅमेऱ्यासमोर पोज द्यायला नेहमीच उत्साहात असते. मात्र या उत्साहात तिने बाजूला उभ्या असलेल्या आजीला आणि आईलाही धक्का दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर आता रिद्धिमाने स्पष्टीकरण दिलं आहे.
'बज'ला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमा साहनी म्हणाली, "असं काही घडलं नाही. माध्यमांमध्ये हे खूपच चढवून दाखवलं जात आहे. बिचारी छोटी मुलगी फक्त पोज देण्याचा प्रयत्न करत होती. ती अजिबात त्रासलेली नव्हती. उलट खूप आतुर होती. इतकी की आम्ही कारमधून येतानाच ती सतत बोलत होती की तिथे फोटोग्राफर असतील आणि मी या या पोज देईन. झालं असं की पापाराझी आम्हाला सोबत उभं राहा म्हणत होते आणि समाराला एकटीला पोज द्यायची होती."
छोटी समारा आईला नंतर काय म्हणाली?
तिने तिच्या आजीला धक्का दिला नाही. समारा नंतर मला म्हणाली की," मी कधी धक्का दिला? मी तर स्व: पोज देण्याचा प्रयत्न करत होते. मी फक्त माझा हात पुढे केला कंफर्टेबल होत होते. मी पोजच देत होते. मी कधी कोणाला धक्का दिला नाही. गेल्या वेळी जेव्हा मी अल्लडपणा करत होते तेव्हाही यांना त्रास झाला आणि आता जेव्हा मी काही केलं नाही तरी यांना त्रास होतोय."
आजकाल मुलं या सगळ्या गोष्टींबाबतीत खूप जागरुक असतात. चांगलं वाईट सगळंच आज त्यांना दिसून येतं. मी आणि माझी आई समारासोबत सतत यावर बोलत असतो. या प्रसिद्धीचा फायदा, नुकसान, चांगलं, वाईट, गलिच्छ काय सगळंच तिला सांगतो जेणेकरुन तिच्यावर कोणता परिणाम होऊन नये."