​रिचाचा ‘कॅब्रे’ येणार तरी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 11:32 IST2016-06-29T06:02:18+5:302016-06-29T11:32:18+5:30

पूजा भटचा महत्त्वकांक्षी चित्रपट ‘कॅब्रे’ प्रदर्शित होणार का? आणि झाला तर कधी? असा खोचक सवाल तिला विचारला जात आहे. ...

Richa's 'cabre' will never come? | ​रिचाचा ‘कॅब्रे’ येणार तरी कधी?

​रिचाचा ‘कॅब्रे’ येणार तरी कधी?

जा भटचा महत्त्वकांक्षी चित्रपट ‘कॅब्रे’ प्रदर्शित होणार का? आणि झाला तर कधी? असा खोचक सवाल तिला विचारला जात आहे.

आतापर्यंत दोन या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अखेर पूजाने स्वत: याबाबत ट्विटरवर खुलासा केला की, काही कॉपीराईट इश्यूज्मुळे चित्रपटाच्या प्रदर्शनास विलंब होत आहे.

हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावून सन्मानजनक प्रमाणात तो प्रदर्शित करण्यात येणार आहे. रिचा चड्डा स्टारर हा चित्रपट ‘कॅब्रे’ डान्सरच्या आयुष्यावर आहे.

रिचा यामध्ये झारखंडमधील एका छोट्या गावातील मुलीची भूमिका साकारत असून डान्सच्या विश्वात मोठे नाव कमावण्याचे स्वप्न बाळगून ती असते.

कौस्तव नियोगी दिग्दर्शित हा चित्रपट आगोदर २७ मे रोजी प्रदर्शित होणार होता. नंतर १० जून तारीख सांगण्यात आली. आता मात्र, कोणतीच तारीख निश्चित नाही.

Web Title: Richa's 'cabre' will never come?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.