ऋचा चढ्ढाही आता गाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2017 18:14 IST2017-03-12T12:44:58+5:302017-03-12T18:14:58+5:30

बॉलिवूड अभिनेत्यांना गाण्याचे वेड सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक जण अभिनयाबरोबर गाण्याच्या क्षेत्रातही आपले नशीब आजमावताना दिसत आहेत. आता ...

Richa Chadha will sing now! | ऋचा चढ्ढाही आता गाणार!

ऋचा चढ्ढाही आता गाणार!

लिवूड अभिनेत्यांना गाण्याचे वेड सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक जण अभिनयाबरोबर गाण्याच्या क्षेत्रातही आपले नशीब आजमावताना दिसत आहेत. आता आणखी एक नाव यात समाविष्ट झाले आहे. हे नाव आहे ऋचा चढ्ढा. आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर यांच्यानंतर ऋचाही गाणं म्हणताना दिसून येईल. 
ऋचा चढ्ढा ही आपल्या बिंदास स्वभावामुळे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. ऋचा म्हणते की, मी ज्यावेळी रस्त्यावर जाते त्यावेळी लोक मला ओळखतात, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी प्रसिद्ध आहे म्हणून नव्हे तर हे माझ्या प्रतिमेमुळे आहे. ज्याच्या अनुसार मी माझे शारीरिक हावभाव बदलते.’ आपल्या अभिनयाने ऋचाने आपले नाव गाजविले आहे.
गाण्याविषयी बोलताना ऋचा म्हणते, ‘या नव्या अनुभवामुळे मी खूप उत्सुक आहे. पहिल्यांदाच एका गायिका म्हणून मी तुम्हाला दिसेन. माझ्यासाठी हा एक वेगळा क्षण असणार आहे. लोकांना माझे गाणे आवडेल अशी मला अपेक्षा आहे.’
सध्या ऋचा विविध प्रोजेक्टवर काम करते आहे. अशाच एका चित्रपटात ती अभिनयासोबत गातानाही दिसेल. काही दिवसांपूर्वीच ती गाण्याची शौकिन असून, रियाजही करीत असल्याचे वृत्त होते. येत्या चित्रपटात ती आपल्या सुंदरतेबरोबर आपल्या गाण्यामुळेही ओळखली जाईल, यात शंका नाही. 
काही दिवसांपूर्वी तिने ‘फुकरे रिटर्न्स’ची शूटिंग संपविली होती. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय ती लव्ह सोनिया,  या चित्रपटातही काम करते आहे.



Web Title: Richa Chadha will sing now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.