Ali Fazal-Richa Chadha Wedding : मोहब्बत मुबारक! रिचा चड्ढा व अली फजलने शेअर केले संगीत सेरेमनीचे रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 04:52 PM2022-09-30T16:52:55+5:302022-09-30T16:57:08+5:30

Ali Fazal-Richa Chadha Wedding Photos : फोटो शेअर करताना ‘मोहब्बत मुबारक’ असं कॅप्शन रिचाने दिलं आहे. अलीनेही सेम फोटो शेअर करत, ‘तुमको भी’ असं लिहिलं आहे.

Richa Chadha and Ali Fazal share pictures from their wedding function | Ali Fazal-Richa Chadha Wedding : मोहब्बत मुबारक! रिचा चड्ढा व अली फजलने शेअर केले संगीत सेरेमनीचे रोमॅन्टिक फोटो

Ali Fazal-Richa Chadha Wedding : मोहब्बत मुबारक! रिचा चड्ढा व अली फजलने शेअर केले संगीत सेरेमनीचे रोमॅन्टिक फोटो

googlenewsNext

Ali Fazal-Richa Chadha Wedding Photos :रिचा चड्ढा व अली फजल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. रिचा व अलीच्या लग्नविधींना सुरूवात झाली आहे. काही तासांपूर्वी रिचाने तिच्या मेहंदीची झलक दाखवली होती. आता तिने तिच्या होणाऱ्या पतीसोबतचे दोन रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अली व रिचा रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहेत.
हे फोटो संगीत सेरेमनीचे आहेत. गुरूवारी रात्री रिचा व अलीची संगीत सेरेमनी पार पडली. संगीत सेरेमनीच्या फोटोत दोघांनी फॅशन डिझाईनर अबू जानी व संदीप खोसला यांनी डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये आहेत. फोटो शेअर करताना ‘मोहब्बत मुबारक ’ असं कॅप्शन रिचाने दिलं आहे. अलीनेही सेम फोटो शेअर करत, ‘तुमको भी’ असं लिहिलं आहे.

रिपोर्टनुसार, संगीत सेरेमनीमध्ये अली व रिचाने ‘अंबर सरिया’ या गाण्यावर डान्स केला. हे रिचाच्या ‘फुकरे’ चित्रपटांचं गाणं आहे. 
संगीत सेरेमनीदरम्यान मेन्यूपासून तर इव्हेंटच्या फ्लोरपर्यंत प्रत्येक गोष्ट अली व रिचाच्या चित्रपटांच्या थीमनुसार डिझाईन करण्यात आली होती. दोघांच्या ऑन स्क्रीन कॅरेक्टरच्या नावावर आणि त्यांच्या चित्रपटांच्या नावांवर अनोखे कॉकटेल व मॉकटेल पाहुण्यांसाठी ठेवलं गेलं होतं.

रिचाच्या मेहंदीसाठी राजस्थानातून पाच आर्टिस्ट बोलवले होते. रिचाच्या हातावर काढण्यात आलेल्या मेहंदीमध्ये अलीचं नाव आहे. तिच्या दोन लाडक्या मांजरींचे स्केच आहे. कारण तिच्याकडे दोन मांजरी आहेत. एकीचं नाव जुगनी तर दुसरीचं नाव कमली आहे. या दोन्ही मांजरींवर रिचाचं प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे या मांजरींना रिचा कशी विसरणार होती? अलीच्या नावाचं पहिलं अक्षरही तिच्या मेहंदीमध्ये आहे.
रिचा व अलीने एक व्हाईस मॅसेजही शेअर केला आहे. यात अलीचाही आवाज आहे. आम्ही दोन वर्षांआधी वेडिंग सेरेमनी प्लान केली होती. पण कोरोना महामारी व पर्सनल प्रॉब्लेम्समुळे आम्हाला हे सेलिब्रेशन पुढे ढकलावं लागलं होतं, असं दोघांनी या व्हाईस मॅसेजमध्ये म्हटलं आहे.

रिचा आणि अलीचा लग्नसोहळा दिल्लीत पार पडत असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रिचा आणि अली येत्या 4 ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. रिचा आणि अलीच्या लग्नातील सर्व कार्यक्रमांमध्ये अन्नाची नासाडी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.  

Web Title: Richa Chadha and Ali Fazal share pictures from their wedding function

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.