'दुसऱ्याची व्हॅनिटी वापरली म्हणून...', रिचा चड्डाने सांगितलं फिल्मइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 09:25 AM2023-07-07T09:25:59+5:302023-07-07T09:27:00+5:30

माझ्यासोबत अनेकदा भेदभाव झाला आहे.

richa chadda talks about truth of film industry how inequality is there and how they treats you | 'दुसऱ्याची व्हॅनिटी वापरली म्हणून...', रिचा चड्डाने सांगितलं फिल्मइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव

'दुसऱ्याची व्हॅनिटी वापरली म्हणून...', रिचा चड्डाने सांगितलं फिल्मइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डा (Richa Chaddha) गेल्यावर्षीच लग्नबंधनात अडकली. फुकरे सिनेमामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज तिने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र करिअरच्या सुरुवातीला तिने खूप स्ट्रगल केलं आहे. बराच अपमानही सहन केला आहे. इंडस्ट्रीत तिला भेदभावाला सामोरं जावं लागलं. नुकतंच एका मुलाखतीत तिने त्या कठीण काळाविषयी अनेक मोठे खुलासे केले.

रिचा चड्डा म्हणाली, 'माझ्यासोबत अनेकदा भेदभाव झाला आहे. पहिल्या सिनेमाच्या शूटिंगवेळी सुद्धा मला खूप वाईट वाटलं. ओए लकी लकी ओएच्या शूटिंगवेळी मी कॉलेजमधून थेट सेटवर यायचे. तेव्हा मला १०३ ताप होता. मला एकाने सांगितले इथे एक व्हॅनिटी आहे. ती ज्या कलाकाराची आहे त्याला यायला अजून वेळ आहे. त्यामुळे या व्हॅनिटीत जाऊन मी तयार होऊ शकते.'
 
ती पुढे म्हणाली,'मी सेटवर तयार होऊन गेले आणि नंतर मी वापरलेलं सर्व सामान कोणीतरी व्हॅनिटी बाहेर फेकून दिलं. ते माझं सामान नव्हतं केवळ मी ते वापरलं होतं म्हणून कोणीतरी ते फेकून दिलं. लिपस्टिक खराब झाल, आरसा तुटला. ते दृश्य पाहून मला खूप वाईट वाटलं होतं.'

रिचा चड्डा आणि अली फजल यांनी गेल्याच वर्षी लग्नगाठ बांधली. त्यांनी प्रोडक्शन हाऊसही सुरु केलं. त्यांनी सेटवर समान वागणूक देण्याविषयी भाष्य केलं. कोण चांगल्या हॉटेलमध्ये राहील आणि कोण वाईट असा भेदभाव आम्ही करत नाही. आम्ही खूप मोठे आहोत अशी वागणूक आम्ही कोणालाच देत नाही असंही तिने सांगितलं.

Web Title: richa chadda talks about truth of film industry how inequality is there and how they treats you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.