Rhea Chakraborty ने दीपिका पादुकोण- आलिया भट्टलाही टाकले मागे, बनली मोस्ट डिजायरेबल वुमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 15:55 IST2021-06-07T15:49:39+5:302021-06-07T15:55:46+5:30
सुशांत सिंहच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती सोशल मीडियावरु गायब झाली होती. मात्र काही महिन्यांपासून ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे.

Rhea Chakraborty ने दीपिका पादुकोण- आलिया भट्टलाही टाकले मागे, बनली मोस्ट डिजायरेबल वुमन
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या घसरलेली करिअरची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीची इमेज खराब झाली. तिला तुरुंगाचीही हवा खावी लागली. सध्या मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याच्या प्रयत्नात ती आहे. यासाठी ती प्रचंड प्रयत्नही करत आहे. दरम्यान, रिया चक्रवर्तीविषयी एक बातमी समोर आली आहे. मोस्ट डिजायरेबल वुमनच्या यादीत रिया चक्रवर्तीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये रिया चक्रवर्ती अव्वल ठरली आहे. रियाने अनेक सेलिब्रिटींना हरवून या यादीत अव्वल स्थान मिळविले आहे.
'द टाइम्सने' 50 मोस्ट डिजायरेबल वुमन 2020 यादी जाहीर केली आहे. आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा यासारख्या आघाडीच्या नायिकांचा समावेश होता. रिया चक्रवर्तीने प्रसिद्ध अभिनेत्रींना पछाडत मोस्ट डिजायरेबल वुमन 2020 यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. तर दुस-या नंबरवर एडलिन कैस्टेलिनो आहे. २०२० मध्ये मिस यूनिवर्सची तीसरी रनरअप ठरली होती.
तर तिस-या नंबरवर दिशा पाटनी, चौथ्या नंबरवर कियारा आडवाणी आणि पाचव्या नबंरवर दीपिका पादुकोणचे नाव समोर आले आहे. याव्यरिरिक्त सहाव्या नंबरवर कैटरीना कैफ, सातव्या नंबरवर जैकलीन फर्नांडिस, आठव्या नंबरवर अनुप्रिया गोएनका, तर रूही सिंह दहाव्या नंबरवर आवित्रि चौधरीने बाजी मारली आहे.
सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती सोशल मीडियावरु गायब झाली होती. मात्र काही महिन्यांपासून ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. सुशांतच्या निधनाला रियाला जबाबदार ठरवण्यात आले त्यामुळे रिया चक्रवर्तीला नेटीझन्स पसंत करत नाहीत. तिला पाहताच तिच्यावर संताप व्यक्त करताना दिसतात.
कोरोनाकाळात इतर सेलिब्रेटींप्रमाणे रियाने देखील मदतीसाठी हात पुढे केले होते. कोरोना रुग्णांचे होणार हाल बघून दुःखी झाल्याचे तिने सांगितले होते. ज्याला कोणाला मदतीची गरज असेल त्याच्या मदतीला रिया हजर असेल म्हणते तिने मदतीचे आश्वासनही दिले होते.तुर्तास तिचे बॉलिवूडमध्ये कमबॅक होणार आहे की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.