करुन करुन भागली,देव पुजेला लागली,मंदिरात जाऊन,गरिबांना मदत करताना दिसली Rhea Chakraborty
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 18:36 IST2021-11-12T18:34:30+5:302021-11-12T18:36:55+5:30
Rhea Chakraborty लॉकडाऊन काळातही अचानक गरजुंना मदत करणार असल्याचेही तिने म्हटले होते. त्यावेळी तिच्यावर टीका करण्यात आली होती.

करुन करुन भागली,देव पुजेला लागली,मंदिरात जाऊन,गरिबांना मदत करताना दिसली Rhea Chakraborty
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला रिया चक्रवर्तीलाच जबाबदार धरले गेले. यासाठी रियाला जेलची हवाही खावी लागत होती. फारशी कोणाला माहिती नसणारी रिया आज सुशांतच्या चाहत्यांच्या चांगलीच परिचयाची झाली आहे. सुशांतची गर्लफ्रेंड असलेली रिया आधी आलिशान आयुष्य जगत होती. मात्र सुशांतच्या निधनानंतर सगळं काही होत्याचं नव्हतं झालं. अतिशय ग्लॅमरस लाईफस्टाइल मेंटेन करणारी रिया आता अगदी साध्या वेषातच पाहायला मिळते.
आता रिया तिची इमेज बदलण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसतंय.लॉकडाऊन काळातही अचानक गरजुंना मदत करणार असल्याचेही तिने म्हटले होते. त्यावेळी तिच्यावर टीका करण्यात आली होती. रिया जे काही करेल त्यावर चाहते प्रचंड टीका करतात. संताप व्यक्त करताना दिसतात. पुन्हा एकदा रिया चर्चेत आली आहे. इमेज बदलण्याच्या प्रयत्नात असणारी रियावर यावेळी चाहते भडकल्याचे पाहायला मिळतंय.सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात अगदी कुर्ता पायजामा ड्रेसमध्ये ती मंदिरात पुजा करताना दिसते. तर दुसरीडे गरिबांना मदतही करताना दिसते. रियाचे बदलेले रुप पाहून चाहत्यांनी पुन्हा एकदा तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. तिचे हे फोटो समोर येताच सुशांतचे चाहते तिला प्रचंड ट्रोल करताना दिसत आहेत.
रियाचे हे फोटो पाहून युजर्स संतप्त प्रतिक्रीया देत आहेत. एकाने म्हटलंय की, देवपुजा केल्याने तुझी पापं काही धुतली जाणार नाहीत. अनेकांनी तिला नौटंकी करते, दिखावा करत असल्याचे म्हणत टीका करत आहेत. तर काहींनी म्हटलंय प्रसिद्धीसाठी फोटोग्राफरला बरोबर घेऊन गेली होतीस का असे कमेंट्स करत आहेत. हळूहळू सर्वकाही विसरत रियाचे आयुष्य पुन्हा एकदा रुळावर येत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.