काहीतरी गडबड नक्कीच होती...! सुशांतच्या मैत्रिणीने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 16:36 IST2020-08-23T16:36:15+5:302020-08-23T16:36:55+5:30
सुशांतची ही मैत्रिण रिया व सुशांतच्या पार्ट्यांना हजर असायची. ती अनेकदा सुशांतच्या फ्लॅटवरही यायची.

काहीतरी गडबड नक्कीच होती...! सुशांतच्या मैत्रिणीने केला मोठा खुलासा
सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आल्यानंतर पुन्हा नव्याने चक्र फिरू लागली आहेत. याचदरम्यान सुशांतच्या एका मैत्रिणीने रिया व सुशांतबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांतची ही मैत्रिण रिया व सुशांतच्या पार्ट्यांना हजर असायची. ती अनेकदा सुशांतच्या फ्लॅटवरही यायची.
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, ही मैत्रिण रिया व सुशांत दोघांच्याही जवळची होती. तिने सांगितले की, सुशांतचे संपूर्ण करिअर आणि त्याचा सगळा आर्थिक व्यवहार रिया पाहायची. रियाचे केवळ त्याच्या पैशांवरच कंट्रोल नव्हते तर आपल्या शॉपिंगवरही ती सुशांतचा पैसा उधळायची.
सुशांतच्या मनात निर्माण केला भूत-प्रेतांची भीती
सुशांतच्या या मैत्रिणीचा दाव्यानुसार, रिया सुशांतच्या मनात भूत-प्रेतांची भीती निर्माण करायची. मी असे करण्यापासून तिला रोखले असता तिने मला घरात येण्यास मनाई केली. सुशांतची तब्येत बिघडली होती, तेव्हा रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती हेच सुशांतसाठी औषधे आणायचे. सुशांत व रिया या दोघांत काहीत विचित्र होते.
सीबीआयची टीम गेल्या तीन दिवसांपासून सुशांत प्रकरणाचा तपास करते आहे. आत्तापर्यंत सीबीआयने सुशांतचा हाऊसकिपर नीरज, मित्र सिद्धार्थ पिठानी आणि दीपेश सावंत यांचे पुन्हा जबाब नोंदवून घेतले. यानंतर सीबीआय टीम रिया चक्रवर्तीची चौकशी करण्याची शक्यता आहे. रिया या प्रकरणातील मुख्य संशयित आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पाटणा पोलिसांत एफआयआर दाखल केला होता.