सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती 'या' व्यक्तीच्या प्रेमात, रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 11:03 IST2023-08-30T11:02:23+5:302023-08-30T11:03:06+5:30

रिया चक्रवर्ती उद्योगपतीबरोबर रिलेशशिपमध्ये असल्याच्या चर्चा, कोण आहे ती व्यक्ती?

rhea chakraborty dating business man nikhil kamath after sushant singh rajput death | सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती 'या' व्यक्तीच्या प्रेमात, रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती 'या' व्यक्तीच्या प्रेमात, रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री चर्चेत आली होती. सुशांतच्या आत्महत्येसाठी रियावर आरोप करण्यात आले होते. त्याच्या मृत्यूप्रकरणात रियाची चौकशीही करण्यात आली होती. त्यांच्या लव्ह लाइफबद्दल तेव्हा चर्चा रंगली होती. आता रिया पुन्हा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आता रिया उद्योगपती निखिल कामथला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. 

निखिल आधी रियाचं नाव बंटी सजदेहशी जोडलं गेलं होतं. बंटी हा अभिनेता सोहेल खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचा भाऊ आहे. तर निखिल मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.  मीडिया रिपोर्टनुसार आता रिया आणि निखिल रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांमध्ये ५ वर्षांचं अंतर आहे. रिया ३१ वर्षांची आहे तर निखिल ३६ वर्षांचा आहे. 

कोण आहे निखिल कामथ? 

निखिल कामथ हा एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. ८ हजार रुपये पगारापासून त्याने नोकरी करायला सुरुवात केली होती. त्याबरोबरच त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 'जेरोधा' ही कंपनी सुरू केली. निखिल कामथ एकूण २८ हजार कोटी रुपयांचा मालक आहे. अर्धी कमाई दान करण्याच्या निर्णयानंतर निखिल चर्चेत आला होता. निखिलने २०१९साली इटलीमध्ये विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. परंतु, हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यामुळे घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले

Web Title: rhea chakraborty dating business man nikhil kamath after sushant singh rajput death