Rhea Chakraborty : पुढच्या वेळी स्वत:ला...., सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण चर्चेत येताच रिया चक्रवर्तीनं केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 10:59 AM2022-12-28T10:59:31+5:302022-12-28T11:02:16+5:30

Sushant Singh Rajput, Rhea Chakraborty : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे रिया चक्रवर्ती. अनेक आरोप झेलणारी आणि ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात गेलेली रिया सध्या तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

rhea chakraborty cryptic post after sushant singh rajput death claimed as murder | Rhea Chakraborty : पुढच्या वेळी स्वत:ला...., सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण चर्चेत येताच रिया चक्रवर्तीनं केली पोस्ट

Rhea Chakraborty : पुढच्या वेळी स्वत:ला...., सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण चर्चेत येताच रिया चक्रवर्तीनं केली पोस्ट

googlenewsNext

14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) हे जग सोडून कायमचा निघून गेला. सुशांतच्या मृत्यूला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला. पण सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. सुशांतच्या कुटुंबीयांच्या मते, त्याची हत्या झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकरण थंड पडलं होतं. पण आता पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. कूपर रूग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करताना तिथे हजर असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या खळबळजनक खुलाशानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आलं आहे. अशात आता सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती ( Rhea Chakraborty) हिची एक गर्भित पोस्टही चर्चेत आली आहे.

रियाने एक इन्स्टास्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सुशांतच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण सुशांतच्या निधनानंतर रियाने जे काही झेललं त्याचा संदर्भ मात्र या पोस्टमध्ये सापडतो. ‘पुढच्या वेळी स्वत:च्या ताकदीवर संशय घेण्याआधी हे लक्षात असू दे की, तू आगीतून गेली आहे, वादळं झेलली आहेस, राक्षसांवर विजय मिळवला आहेस...,’अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे.

सुशांत व रिया दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रियाला दोषी ठरलं होतं. रियामुळे सुशांतचा जीव गेला, असा आरोप त्यांनी केला होता. रिया व तिच्या भावाने सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आरोपही होता. ड्रग्जप्रकरणी रियाला अटकही झाली होती. महिनाभर ती तुरुंगात होती.सोशल मीडियावर ती कधी नव्हे इतकी ट्रोल झाली. यानंतर अनेक महिने रियाने स्वत:ला घरात कैद करुन ठेवलं होतं. सोशल मीडियापासूनही ती लांबच होती, मात्र आता हळूहळू रिया नव्याने सुरुवात करताना दिसतेय. सोशल मीडियावरही ती ब-यापैकी अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. 

कूपर हॉस्पीटलमध्ये सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालं होतं. यावेळी हजर असलेल्या हॉस्पीटलचा शवागार सेवक रूपकुमार शाह यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. सुशांतचा मृतदेह बघून, ते आत्महत्येचे प्रकरण आहे, असं वाटलं नव्हतं. सुशांतच्या शरीरावर अनेक खुणा होत्या. त्याची 101 टक्के आत्महत्या नव्हती, असं रूपकुमार यांनी म्हटलं होतं.

Web Title: rhea chakraborty cryptic post after sushant singh rajput death claimed as murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.