दिग्गज गायिका उषा उत्थुप यांचे पती जानी चाको यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 09:04 IST2024-07-09T09:04:26+5:302024-07-09T09:04:55+5:30

लोकप्रिय गायिका उषा उत्थुप यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पतीचं निधन झालंय (usha uthup)

Renowned singer Usha Uthup lost her husband age 78 due to sudden heart attack | दिग्गज गायिका उषा उत्थुप यांचे पती जानी चाको यांचं निधन

दिग्गज गायिका उषा उत्थुप यांचे पती जानी चाको यांचं निधन

प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांचे पती जानी चाको उत्थुप यांचे निधन झाले आहे. जानी चाको यांनी सोमवारी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते.  हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. उषा उत्थुप यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही दुःखद बातमी कळताच इंडस्ट्रीतील अनेकांनी उषा उत्थुप यांना धीर दिला आहे. याशिवाय त्यांचे पती जानी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

उषा उत्थुप यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जानी त्यांच्या घरी टीव्ही पाहत होते आणि त्यादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जानी चाको यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मंगळवारी जानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.


जानी चाको उत्थुप हे गायिका उषा उत्थुप यांचे दुसरे पती होते. जानी यांचा स्वतःचा चहाचा मळा होता. उषा आणि जानी यांची पहिली भेट ७० च्या दशकातील लोकप्रिय रेस्टॉरंट ट्रिनकासमध्ये झाली होती. उषा आणि जानी यांना अंजली आणि सनी ही मुलं आहेत.

Web Title: Renowned singer Usha Uthup lost her husband age 78 due to sudden heart attack