तो सीन आॅनलाईन प्रोमोवरुनही काढा: न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 15:31 IST2016-06-15T10:01:32+5:302016-06-15T15:31:32+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने ज्या दृष्यांना काढून टाकण्यास सांगितले होते, ते तातडीने काढावेत असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने उडता पंजाब ...

Remove the scene from the online promo: Court order | तो सीन आॅनलाईन प्रोमोवरुनही काढा: न्यायालयाचे आदेश

तो सीन आॅनलाईन प्रोमोवरुनही काढा: न्यायालयाचे आदेश

ंबई उच्च न्यायालयाने ज्या दृष्यांना काढून टाकण्यास सांगितले होते, ते तातडीने काढावेत असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने उडता पंजाब चित्रपटाच्या दिग्दर्शकांना दिले आहेत.   
उच्च न्यायालयाने उडता पंजाबच्या दिग्दर्शकाला आॅनलाईन प्रोमोवरुनही ते दृष्य हटविण्यास सांगितले आहे. पंजाबमधील ह्युमन राईट अवेअरनेस संघटनेने जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते दृष्य प्रोमोवरुन हटविले जावे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही तो प्रोमो सुरू असल्याचे या संघटनेचे म्हणणे होते. 
या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात उडता पंजाबविरुद्ध याचिका दाखल केली आहे. त्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्त्याच्या अनुसार उच्च न्यायालयाने एक कटनंतर चित्रपट प्रदर्शनाला परवानगी दिली होती. हा निर्णय योग्य नाही. हा चित्रपट पंजाबची चुकीची प्रतिमा निर्माण करतो. उच्च न्यायालयाला चित्रपटाचे दृष्य कापण्याचा अधिकार नाही, त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयासमोर संघटनेने आपले म्हणणे मांडले आहे. याचिका औपचारिकरित्या नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास नकार दिला. प्रथम अर्ज दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण करावी आणि नंतर ते न्यायालयासमोर आणावे असे म्हटले आहे.

Web Title: Remove the scene from the online promo: Court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.