Video Viral : रेमो डिसुजाचे ख्रिसमस सेलिब्रेशन, सँटासोबत असा केला डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 15:22 IST2020-12-25T15:20:17+5:302020-12-25T15:22:24+5:30
व्हायरल होतोय रेमोचा हा डान्स व्हिडीओ

Video Viral : रेमो डिसुजाचे ख्रिसमस सेलिब्रेशन, सँटासोबत असा केला डान्स
गेल्या 11 डिसेंबरला बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक रेमो डिसुजाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पाठोपाठ त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. काही दिवसांच्या उपचारानंतर रेमोना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सध्या रेमो कुटुंबासोबत वेळ घालवतोय. याचदरम्यान ख्रिसमस सेलिब्रेशनचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
आमिर अलीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओत रेमो सँटासोबत डान्स करतोय. व्हिडीओत रेमो काहीसा अशक्त दिसतोय. पण त्याचा उत्साह कमी झालेला नाही.
याआधी रेमोचा रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.रेमोची पत्नी लिजेलने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यात रेमो संगीताच्या तालावर पाय थिरकवताना दिसला होता. हा व्हिडीओ सुद्धा तुफान व्हायरल झाला होता.
रेमो डिसुजाने अनेक सिनेमांची कोरिओग्राफी करण्यासोबतच काही सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे. 1995 साली त्याने त्याच्या करिअरची सुरूवात केली होती. 2000 साली ‘दिल पे मत ले यार’ या सिनेमासाठी कोरिओग्राफी करण्याची संधी त्याला मिळाली आणि यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आता तो इंडस्ट्रीतील टॉप कोरिओग्राफरपैकी एक आहे. कोरिओग्राफीनंतर त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. एबीसीडी, एबीसीडी 2 आणि स्ट्रीट डांसर या सिनेमांचे त्याने दिग्दर्शन केले.