सुशांतचा शेवटचा सिनमा पाहून, अंकिता लोखंडेला अश्रु अनावर म्हणाली.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 18:05 IST2020-07-25T18:01:54+5:302020-07-25T18:05:35+5:30
सुशांत शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' पाहताना अंकिता पुन्हा भावूक झाली. आपल्या मनात दडलेल्या भावनान तिने वाट मोकळी करून दिली.

सुशांतचा शेवटचा सिनमा पाहून, अंकिता लोखंडेला अश्रु अनावर म्हणाली.....
सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला खूप मोठा धक्का बसला आहे. भलेही त्यांचे ब्रेकअप झाले होते पण अद्याप तिच्या मनात सुशांतसाठी जागा होती. अंकिता आणि सुशांत पवित्र रिश्ता मालिकेतून खूप लोकप्रिय झाले होते. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते भेटले आणि दोघांचे प्रेम जुळले होते. काहीही केले तरी अंकिता लोखंडे सुशांतसह असलेले तिचे बॉन्डींग विसरू शकत नाही. ती आजही दु:खात आहे. अंकिता सुशांतच्या कुटुंबीयांसुद्धा भेटायला गेली होती. अंकिताच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताची वाईट अवस्था झाली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास लावून आत्महत्या केली, त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेमुळे सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला जबरदस्त धक्का बसला आहे.या फोटोवर तिने “तू जिथेही असशील तिथे आनंदी राहा” अशा आशयाचं ट्विट करुन आपलं दु:ख व्यक्त केलं होते.
सुशांत शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' पाहताना अंकिता पुन्हा भावूक झाली. आपल्या मनात दडलेल्या भावनान तिने वाट मोकळी करून दिली. अंकिताने मोजक्या शब्दांत सुशांत प्रतीचं प्रेम, त्याच्या आठवणीने व्याकूळ झालेली पाहायला मिळाली. ‘पवित्र रिश्तापासून दिल बेचारा तक. एक आखिरी बार..’, असं म्हणत अंकिताने दिल बेचारामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिचं सांत्वन करण्याचाही प्रयत्न करत आहेत. अंकिताच नाही तर सुशांतचे चाहते आजही त्याच्या आठवणीत बुडाल्याचे पाहायला मिळेत. त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्याची आठवण काढत असतात. सुशांत या जगात नाही यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाही.