२७ वर्ष झालीत, कुठेच नसते तिची चर्चा, 'हम आपके है कौन'ची रीटाला आता ओळखणेही झाले कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:59 IST2021-05-18T16:51:46+5:302021-05-18T16:59:33+5:30
'हम आपके है कौन' सिनेमाव्यतिरिक्त वीराना, सैलाब, धर्म संकट, मां, नमक, अब इंसाफ होगा, आंटी नंबर 1 सिनेमातही ती झळकली आहे.

२७ वर्ष झालीत, कुठेच नसते तिची चर्चा, 'हम आपके है कौन'ची रीटाला आता ओळखणेही झाले कठीण
हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा म्हणजे 'हम आपके हैं कौन'. राजश्री प्रॉडक्शनच्या या सिनेमानं त्याकाळी तिकीटखिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले होते. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या हम आपकै हैं कौन या सिनेमाची कथा प्रत्येकालाच भावली होती. सलमान माधुरी प्रमाणे सगळ्याच कलाकरांच्या भूमिका गाजल्या असल्या तरी रीटा ही भूमिकादेखील रसिकांच्या चांगलीच लक्षात आहे. सिनेमातील इतर कलाकार आजही सिनेसृष्टीत वेगवेगळ्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत आहेत.मात्र रीटाही भूमिका साकारणारी साहिला चढ्ढा मात्र इंडस्ट्रीतून गायब आहे. विशेष म्हणजे वयाच्या १० व्या वर्षीच साहिलाने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. साहिलाने मिस इंडियाचाही खिताब जिंकला आहे. त्याआधी जवळपास २५ ब्युटी कॉन्टेस्टची तिने जिंकले होते.
हम आपके है कौन सिनेमाव्यतिरिक्त वीराना, सैलाब, धर्म संकट, मां, नमक, अब इंसाफ होगा, आंटी नंबर 1 सिनेमातही ती झळकली आहे. पण खर्या अर्थाने तिला हम आपके है कौन सिनेमामुळे चांगली पसंती मिळाली होती. सिनेमाला २६ वर्षपूर्ण झाली असली तरी सगळ्याच व्यक्तिरेखा तितक्याच रसिकांच्या लक्षात आहेत. रीटा आज सिनेसृष्टीत कार्यरत नाही लग्नानंतर ती संसारात बिझी झाली.
निर्मल बालीसोबत तिने संसार थाटला.निर्मल हा संजय दत्तचा चुलत भाऊ आहे. निर्मल अभिनेता असून अनेक मालिका आणि सिनेमात तो झळकला आहे.या कपलला एक मुलगी आहे. साहिलाच्या लूकमध्येही कमालीचा बदल झाला आहे. तिचा आत्ताचा लूक पाहून तिला ओळखणेही कठिण जाईल. साहिला लाईमलाटइपासून दूर जात सुखाने संसार करत आहे.
नुकताच सोशल मीडियावर साहिला चढ्ढाचा एक फोटो समोर आला आहे. सलमान आणि माधुरीसोबतचा साहिलाचा हा फोटो आहे. सलमान माधुरीसोबत असलेली ही रीटा म्हणजे साहिला असल्याचे कळताच अनेकांनी आश्चर्यच व्यक्त केले आहे. पूर्वीसारखी ती दिसत नसली तरी तिचा लूक इतका बदलला आहे की, ही तिच आहे का असा प्रश्न रसिकांना पडल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावरदेखील ती फारशी सक्रीय नसते.