/>स लमानच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. फिल्मचा ट्रेलर आणि एकानंतर एक रिलीज होणार्या गाण्यांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अशातच आता सलमान खानने ट्विटरवर चित्रपटाचे टायटल साँग रिलीज केले. यामध्ये सल्लुचे दोन वेगवेगळे रूपं म्हणजेच डबलरोल स्पष्टपणे दिसून येत आहेत. एका रोलमध्ये तो भोला-भाला, मस्ती करणारा दिसत आहे तर दुसर्यात शांत, गंभीर आणि मिशा असणार्या अवतारात दिसतोय. या गाण्यात सोनमही कमालीची सुंदर दिसत आहे. सोनमसाठी पलक मुच्चलने आवाज दिलेले हे गाणे प्रेक्षकांची नक्कीच वाहवा मिळवणार