​आझाद हिंद फौजेवर तिमांशू धुलियाचा चित्रपट मे मध्ये होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 14:03 IST2017-02-26T08:33:00+5:302017-02-26T14:03:00+5:30

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘रंगून’ या चित्रपटाची कथा दुसºया महायुद्धावर आधारित आहे. यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद ...

Release of Himanshu Dhulia film on Azad Hind Fauj will be released in May | ​आझाद हिंद फौजेवर तिमांशू धुलियाचा चित्रपट मे मध्ये होणार रिलीज

​आझाद हिंद फौजेवर तिमांशू धुलियाचा चित्रपट मे मध्ये होणार रिलीज

ग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘रंगून’ या चित्रपटाची कथा दुसºया महायुद्धावर आधारित आहे. यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेचा उल्लेख करण्यात आला आहे. आता आझाद हिंद फौजेवर दिग्दर्शक तिमांशू धुलिया चित्रपट तयार केला असून हा चित्रपट मे महिन्यात रिलीज केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या चित्रपटाचे नाव फायनल करण्यात आले नाही. या चित्रपटात कुणाल कपूर, अमित साध आणि मोहित मारवाह मुख्य भूमिका साकारणार आहेत. 

या चित्रपटाबद्दल राज्यसभा टीव्हीचे सीईओ गुरदीप सिंह सप्पल यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही या चित्रपटाला आरएसटीव्हीसाठी अधिकृत केले आजे. आता हा चित्रपट तयार झाला आहे व तो मे महिन्यात रिलीज होणार आहे. एतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटातून आझाद हिंद फौजेच्या (आयएनए) सदस्यांविरोधात १९४० साली लाल किल्यावर चालविण्यात आलेल्या खटल्याचे चित्रण करण्यात आले आहे. 



ब्रिटीश भारतीय सेनेतील अधिकारी कर्नल प्रेम सहगल, कर्नल गुरुबख्श सिंह ढिल्लन आणि मेजर जनरल शाह नवाज खान हे क्रमश: मलाया, सिंगापूर आणि बर्मामध्ये युद्धबंदी होते. यांचे राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर झालेल्या सुनावनीत कोर्ट मार्शल करण्यात आले होते. तिघांवर राजद्रोह, प्रताडना एवढेच नव्हे तर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांचा बचाव सर तेज बहादूर सप्रु यांच्या नेतृत्वातील अनेक वकिलांनी केला होता. 

या चित्रपटाच्या तयारीसाठी अभिनेत्यांनी आयएनएच्या अधिकाºयांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सप्पल म्हणाले, आम्ही रागदेश या चित्रपटाव्यतिरिक्त भारतीय सेनेवर आधारित अनेक चित्रपटांना अधिकृत केले आहे. रागदेश या चित्रपटाची निर्मिती श्याम बेनेगल करीत आहेत. या चित्रपटाची पूर्वतयारी झाली असून लवकर याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. सप्पल म्हणाले, आम्ही सरदार पटेल यांच्यामाध्यमातून भारतीय राज्यांना एकीकृत करण्याच्या संदर्भात एका चित्रपटाचा प्रस्ताव दिला आहे. सध्या आम्ही या चित्रपटाच्या व्यवहारिकतेवर काम करीत आहोत. 


Web Title: Release of Himanshu Dhulia film on Azad Hind Fauj will be released in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.