‘काला’चे पहिले गाणे रिलीज; रजनीकांतच्या स्टाइलवर व्हाल फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 21:07 IST2018-05-02T15:37:59+5:302018-05-02T21:07:59+5:30

सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित ‘काला’ या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले असून, त्यात रजनीकांत यांची स्टाइल बघण्यासारखी आहे.

Release the first song of 'black'; Rajinikanth's style will be on Fida! | ‘काला’चे पहिले गाणे रिलीज; रजनीकांतच्या स्टाइलवर व्हाल फिदा!

‘काला’चे पहिले गाणे रिलीज; रजनीकांतच्या स्टाइलवर व्हाल फिदा!

परस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘काला’ या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. याबाबतची माहिती स्वत: निर्माता धनुष यानेच दिली आहे. धनुष रजनीकांत यांचा जावई आहे. धनुषने ट्विट करताना म्हटले की, ‘सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रशंसकांसाठी एक सरप्राईज आहे.’ दरम्यान, धनुषच्या वंडरबार फिल्म्सने ‘काला’ चित्रपटाची विविध भाषांमध्ये निर्मिती केली आहे. चित्रपटात नाना पाटेकर, हुमा कुरेशी, समुद्रकनी आणि ईश्वरी राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ७ जून रोजी जगभरात प्रसिद्ध केला जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पी. रंजित यांनी केले आहे. 

६७ वर्षीय अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत त्यांचा हा दुसरा चित्रपट आहे. या अगोदर २०१६ मध्ये आलेल्या रजनीकांत यांच्या ‘कबाली’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन पी. रंजित यांनीच केले होते. दरम्यान, ‘काला’ या चित्रपटाला संतोष नारायण यांनी संगीत दिले आहे. हे गाणे तेलगू, तामीळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात रजनीकांत एका गॅँगस्टरच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहेत. 



सुरुवातीला अशा बातम्या होत्या की, चित्रपटाची कथा मुंबई अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित आहे. मात्र नंतर निर्मात्यांनी अशाप्रकारच्या बातम्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला. दरम्यान, या चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. कारण बºयाच काळानंतर रजनीकांत यांचा मोठ्या पडद्यावर जलवा बघावयास मिळणार आहे. 

Web Title: Release the first song of 'black'; Rajinikanth's style will be on Fida!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.