रेखा यांचा साधेपणा! फोटो काढायला आलेल्या फॅनच्या खांद्यावर हात ठेवला अन्...; व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:46 IST2025-04-17T15:46:35+5:302025-04-17T15:46:54+5:30

रेखा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.

rekha sweet gesture to fan to click photo with her netizens praised actress video | रेखा यांचा साधेपणा! फोटो काढायला आलेल्या फॅनच्या खांद्यावर हात ठेवला अन्...; व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

रेखा यांचा साधेपणा! फोटो काढायला आलेल्या फॅनच्या खांद्यावर हात ठेवला अन्...; व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूडची हसीना रेखा या वयातही चाहत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या असण्याने प्रत्येक इव्हेंटला चार चांद लागतात. त्यांच्या सौंदर्याची कायमच चर्चा होताना दिसते. पण, रेखा यांच्या सौंदर्यासोबतच त्यांचं मनंही खूप मोठं आहे हे दिसून आलं आहे. रेखा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. 

रेखा यांनी नुकतीच एका अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली होती. हिरव्या रंगाची साडी नेसून ग्लॅमरस लूक करत या अवॉर्ड फंक्शनला त्या आल्या होत्या. रेड कार्पेटवर त्यांनी पापाराझींना पोझही दिल्या. यावेळी एक चाहता रेखा यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आला. रेखा यांनी चाहत्याला दिलेल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याच्या खांद्यावर रेखा यांनी हात ठेवला. त्यांचा साधेपणा पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 


रेखा यांचा हा व्हिडिओ विरल भय्यानीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहते म्हणतात, "यांच्या जागी जर जया बच्चन असत्या तर?", "जया बच्चन आणि हेमा मालिनी यांनी काहीतरी शिकलं पाहिजे", "तुमच्यासोबत शर्यत नाहीच" अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

Web Title: rekha sweet gesture to fan to click photo with her netizens praised actress video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.