अमिताभ बच्चन यांच्या नातवाला फ्लाईंग किस केलं अन्...; 'इक्कीस'च्या स्क्रीनिंगला रेखा यांचा क्यूट अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:49 IST2025-12-30T13:46:10+5:302025-12-30T13:49:43+5:30
रेखा यांनी इक्कीसच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. तेव्हा बिग बींचा नातू अगस्त्यसाठी रेखा यांनी केलेली कृती सर्वांचं लक्ष वेधून गेली

अमिताभ बच्चन यांच्या नातवाला फ्लाईंग किस केलं अन्...; 'इक्कीस'च्या स्क्रीनिंगला रेखा यांचा क्यूट अंदाज
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा आपल्या खास शैलीसाठी आणि सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असते. नुकतीच रेखा यांनी 'इक्कीस' (Ikkis) या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली. यावेळी रेखाने काही असे केले की ज्याची चर्चा आता संपूर्ण सोशल मीडियावर रंगली आहे. तिने चक्क अमिताभ बच्चन यांचा नातू आणि या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अगस्त्य नंदा याच्या पोस्टरला 'फ्लाइंग किस' देऊन आपले प्रेम आणि आशीर्वाद दिला.
स्क्रीनिंगच्या ठिकाणी पोहोचल्यावर रेखाने सर्वात आधी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या मोठ्या पोस्टरसमोर थांबून हात जोडले आणि नतमस्तक होऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. धर्मेंद्र आणि रेखा यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले असून त्यांच्यात घट्ट मैत्री होती. 'इक्कीस' हा धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट असल्याने रेखा यावेळी काहीशा भावुक झालेल्या दिसल्या.
A moment filled with warmth and affection as Rekha blesses her most beloved Agastya Nanda at the special screening of Ikkis. Rekha wore dark glasses to quietly veil her emotions — a rare sight at such events, as she usually keeps her expressive eyes uncovered.#yogenshahpic.twitter.com/L21xIxoidi
— yogen shah (@yogenshahyogen) December 29, 2025
धर्मेंद्र यांना अभिवादन केल्यानंतर रेखा यांची नजर पोस्टरवरील अगस्त्य नंदाच्या फोटोकडे वळली. तिने अतिशय प्रेमाने पोस्टरवरील अगस्त्यच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि त्यानंतर त्याला 'फ्लाइंग किस' दिले. रेखा यांचे हे वागणे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी लक्ष वेधून घेणारे ठरले. अगस्त्य नंदा या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून रेखा यांनी या कृतीतून जणू त्याला त्याच्या मोठ्या पडद्यावरील प्रवासासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत.
'इक्कीस'च्या या स्क्रीनिंगला केवळ रेखाच नाही, तर सलमान खान, सनी देओल, बॉबी देओल आणि संपूर्ण देओल परिवार उपस्थित होता. तसेच तब्बू, अमिषा पटेल आणि फातिमा सना शेख यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. खऱ्या आयुष्यातील युद्धावर आधारित असलेला 'इक्कीस' हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे.