अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल रेखा यांनी केला होता खुलासा, म्हणाल्या होत्या - लोकांची मला नाही पर्वा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 18:37 IST2020-06-09T18:35:35+5:302020-06-09T18:37:36+5:30

अमिताभ व रेखा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा आजही होते.

Rekha had revealed about her relationship with Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल रेखा यांनी केला होता खुलासा, म्हणाल्या होत्या - लोकांची मला नाही पर्वा 

अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल रेखा यांनी केला होता खुलासा, म्हणाल्या होत्या - लोकांची मला नाही पर्वा 

बॉलिवूडच्या काही प्रेमकथांची चर्चा आजही होते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी त्यापैकीच एक. खरे तर रेखा यांचे नाव अनेकांशी जोडले गेले. पण अमिताभ व रेखा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा आजही होते. म्हणूनच आजही कुठल्या समारंभात रेखाची एन्ट्री झाली की, पाठोपाठ मीडियाचे कॅमेरे अमिताभ यांचे हावभाव टिपण्यासाठी वळतात. असे म्हणतात की, रेखा अमिताभवर जीवापाड प्रेम करायच्या.

‘मुकद्दर का सिकंदर’ या सिनेमाचे शूटींग सुरु असताना अमिताभ व रेखा यांच्या अफेअरची कुणकुण मीडियाला लागली आणि या लव्हस्टोरीबद्दलच्या अनेक बातम्या रंगू लागल्या. ‘सिलसिला’मध्ये रेखा यांनी अमिताभच्या गर्लफ्रेन्डची भूमिका साकारली तर जया बच्चन यांनी अमिताभच्या पत्नीची. पण या सिनेमानंतर अचानक अमिताभ व रेखा एकमेकांपासून दुरावले. अमिताभ यांनी रेखांपासून एक अंतर निर्माण केले, ते कायमचे.

सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये रेखा यांना अमिताभ बच्चन यांच्यावरून प्रश्न विचारला असता रेखा यांनी अप्रत्यक्ष उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, ही भूतकाळातील गोष्ट आहे. यानतंर त्यांना जया बच्चनबद्दल प्रश्न विचारला असता रेखा यांनी सांगितले की, 'जया एक बिचारी किंवा इनसिक्युअर महिला आहे असे मला वाटत नाही.' 

यानंतर सिमी यांनी जेव्हा प्रश्न विचारला की, जेव्हा नवरा विश्वास देतो तेव्हा स्त्रीला सुरक्षित वाटते. त्यावर रेखा यांनी सांगितले की, हे आवश्यक नाही. रेखा यांना समजले होतं की, सिमी यांचा हा प्रश्न जया आणि अमिताभ यांच्याबद्दल आहे. सिमी यांचे हावभावदेखील रेखा यांना समजले होते.

मुलाखतीत बोलताना जेव्हा रेखा यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नातेसंबंधांबद्दल आणि लोक काय म्हणतात यावर प्रश्न विचारला गेला तेव्हा त्या म्हणाल्या की, 'लोक काय म्हणतील याने मला काहीही फरक पडत नाही. माझे त्यांच्यावर प्रेम आहे. मी याला कमीपणाने घेत नाही. कधी कधी लोक असंही म्हणतात की, रेखा वेडी आहे जी त्यांच्या प्रेमात पडली आहे. परंतु लोक काय म्हणतात किंवा काय विचार करतात याची मला पर्वा नाही.

Web Title: Rekha had revealed about her relationship with Amitabh Bachchan