रेखा यांनी दिला जान्हवी कपूर आणि खुशीला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 14:03 IST2018-02-28T08:33:29+5:302018-02-28T14:03:29+5:30

श्रीदेवी यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यावेळी रेखा या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. रेखा यांच्या नावावरच चित्रपट चालत असत. रेखा ...

Rekha gave Jahnavi Kapoor and Hushal for her support | रेखा यांनी दिला जान्हवी कपूर आणि खुशीला आधार

रेखा यांनी दिला जान्हवी कपूर आणि खुशीला आधार

रीदेवी यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यावेळी रेखा या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. रेखा यांच्या नावावरच चित्रपट चालत असत. रेखा यांच्या अभिनयाच्या प्रेमात श्रीदेवी देखील होत्या. ऐंशीच्या दशकात तर रेखा यांच्याकडून श्रीदेवी अनेकवेळा मार्गदर्शन देखील घेत असत. श्रीदेवी आणि रेखा या खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. श्रीदेवी यांच्या निधनाने रेखा यांना देखील चांगलाच धक्का बसला आहे. 
श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड कलाकार मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. अख्खे कपूर कुटुंब श्रीदेवींच्या अचानक जाण्याने कोलमडून पडले आहे. त्यांच्या सांत्वनासाठी  बॉलिवूड सेलिब्रिटींची ये-जा सुरू आहे. सेलिब्रेशन स्पोर्ट क्लबमध्ये श्रीदेवींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अनेक सेलिब्रिटींनी श्रीदेवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले असून रेखा देखील श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनासाठी आवर्जून आल्या होत्या. श्रीदेवी यांच्या निधनाने जान्हवी, खुशी आणि बोनी कपूर हे सगळेच पूर्णपणे खचून गेले आहेत. जान्हवी आणि खुशी प्रचंड रडत आहेत. रेखा यांनी जान्हवी आणि खुशी यांना जवळ घेत त्यांना आधार दिला. त्या खूप वेळासाठी तिथेच होत्या. संपूर्ण वेळ त्यांचे लक्ष हे जान्हवी आणि खुशीकडेच होते. 
मंगळवारी रात्री बोनी कपूर व अर्जुन कपूरसह इतर कुटुंबीय श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन आले. अनिल अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने त्यांचे पार्थिव मुंबईत आणले गेले. मंगळवारी रात्री एअरपोर्टवर स्वतः अनिल अंबानी, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनिल कपूर एअरपोर्टवर उपस्थित होते. 
श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता सेलिब्रेशन क्लबमधून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा निघेल. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो चाहते जमले आहेत. 
श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. 

Also Read : ​वधूप्रमाणे सजवले गेले आहे श्रीदेवी यांचे पार्थिव 

Web Title: Rekha gave Jahnavi Kapoor and Hushal for her support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.