Rekha: काय लपवता? सुरकुत्या की..., मध्यरात्री मनीष मल्होत्राच्या घराबाहेर दिसल्या रेखा, नेटकऱ्यांचे लाखो सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 10:52 IST2023-04-11T10:37:36+5:302023-04-11T10:52:02+5:30

Rekha spotted at Malhotra house: सदाबहार रेखा जिथे जातात तिथे लक्ष वेधून घेतात. काल मध्यरात्री रेखा बॉलिवूडचा दिग्गज फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचल्या.मग काय...

rekha at manish malhotra house netizens asking | Rekha: काय लपवता? सुरकुत्या की..., मध्यरात्री मनीष मल्होत्राच्या घराबाहेर दिसल्या रेखा, नेटकऱ्यांचे लाखो सवाल

Rekha: काय लपवता? सुरकुत्या की..., मध्यरात्री मनीष मल्होत्राच्या घराबाहेर दिसल्या रेखा, नेटकऱ्यांचे लाखो सवाल

Rekha spotted at Malhotra houseसदाबहार रेखा जिथे जातात तिथे लक्ष वेधून घेतात. काल मध्यरात्री रेखाबॉलिवूडचा दिग्गज फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचल्या. मग काय, पापाराझींनी त्यांचे फोटो क्लिक करण्यासाठी एकच गर्दी केली. यावेळी रेखा एकदम हटके अवतारात दिसल्या. त्यांचा हा अवतार पाहून नेटकरीही थक्क झालेत. मग काय, नेटकऱ्यांनी एक ना अनेक प्रतिक्रिया दिल्यात. रेखा व त्यांची पर्सनल मॅनेजर फरजाना दोघी एकत्र मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचल्या. काही तासांनंतर तिथून बाहेर पडताना मनीष मल्होत्रा स्वत: रेखांना दारापर्यंत निरोप द्यायला आला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओत पापाराझींना पाहून तो व रेखा दोघंही हैराण झालेले दिसत आहेत. तुम्हाला माहित कसं होतं?असा प्रश्न मनीष पापाराझींना विचारतो. यावर कार नंबर पाठ आहेत आम्हाला, असं उत्तर पापाराझी देतात. यावर पण रात्री १२.३० वाजता? असं मनीष मल्होत्रा विचारतो. तुम्ही कशा आहात? असा प्रश्न पापाराझी करतात. यावर मी एकदम ठीक आहे, असं रेखा म्हणतात.

व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. म्हातारपण येण्याचं नाव नाही,.., अशी कमेंट एका युजरने केली. रेखाने डोक्यावर पगडी का बांधलीये आणि रात्री सनग्लासेस, असा सवाल एका युजरने केला. रेखा स्वत:ला लपवत आहेत. कदाचित सुरकुत्या किंवा आणखी काही..., अशी कमेंट अन्य एकाने केली. मी रेखांना नेहमी फुल स्लीव्ह आणि बॉटल नेक असलेल्या कपड्यांमध्येच पाहिलं आहे. त्या कधीच आपली स्कीन दाखवत नाहीत. कदाचित बोटॉक्स फक्त चेहऱ्यावरच केलं आहे, असं एका युजरने लिहिलं. 

Web Title: rekha at manish malhotra house netizens asking