तारा सुतारिया बनणार करिना कपूरची वहिनी? अरमानच्या लग्नात मिळाला ‘ग्रीन सिग्नल’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 10:22 IST2020-02-05T10:18:42+5:302020-02-05T10:22:13+5:30

 पसंत आहे मुलगी...

reema jain accept aadar jain tara sutaria relationship | तारा सुतारिया बनणार करिना कपूरची वहिनी? अरमानच्या लग्नात मिळाला ‘ग्रीन सिग्नल’ 

तारा सुतारिया बनणार करिना कपूरची वहिनी? अरमानच्या लग्नात मिळाला ‘ग्रीन सिग्नल’ 

ठळक मुद्देकरण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी तारा पहिल्याच चित्रपटानंतर चर्चेत आली.

करिना कपूरचा चुलत भाऊ अरमान जैन व अनीसा मल्होत्रा गत सोमवारी विवाहबंधनात अडकले. कपूर कुटुंबाच्या या लग्न सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. महानायक अमिताभ बच्चन ते अंबानी फॅमिली असे सगळेजण यावेळी दिसले. पण यादरम्यान एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधले. होय, हा चेहरा कुणाचा तर अभिनेत्री तारा सुतारिया हिचा. लाईट पिंक पेस्टल कलरचा लहंगा घातलेल्या ताराला पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. केवळ इतकेच नाही तर ताराने या स्पेशल लग्नात एक स्पेशल परफॉर्मन्सही दिला. त्यानंतर जे काही झाले, ते सर्वांसाठी सरप्राईजिंग होते.


होय, स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, ताराने अरमानच्या लग्नात खास परफॉर्मन्स दिला. तिचे गाणे ऐकल्यानंतर आदरची आई अशी काही इंम्प्रेस झाली की, तिने ताराला आपली सून बनवण्याचा निर्णय घेतला. तारा सुतारिया परफॉर्मन्सनंतर स्टेजवरून उतरताच आदरची आई रिमा जैन यांनी ताराला अलिंगन दिले. शिवाय तारा आणि आदर लवकरच लग्न करणार... दोघांनाही लवकर लग्न करायला हवे. भावाप्रमाणेही आदरनेही आता सेटल व्हावे, असे रिमा जैन म्हणाल्या.


रिमा जैन यांचे ते शब्द सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता. आदर व तारा एकमेकांना डेट करत असल्याचे यावरून स्पष्ट झाले.


आदरने अलीकडे मुंबईतील ‘युटू’ या आयरिश बँडच्या परफॉर्मन्सचा एक व्हिडीओ शेअर केला होता. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ शेअर करताना त्याने ताराला टॅग केले होते. इतकेच नाही तर ‘जेव्हा मी तुझ्या सोबत असतो...,’असेही लिहिले होते. यावर तारानेही ‘नेहमी तुझ्यासोबत...’ असे लिहित आदरचा हा व्हिडीओ लगेच रिशेअर केला होता.  

Web Title: reema jain accept aadar jain tara sutaria relationship