सेक्स सिन्सचा भडीमार असल्यानेच ‘या’ सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने दाखविला रेड सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 13:51 IST2017-02-25T08:21:38+5:302017-02-25T13:51:38+5:30

सध्या सेन्सॉर बोर्डविरुद्ध बॉलिवूड असा काहीसा सामना रंगताना बघावयास मिळत आहे. मात्र असे पहिल्यांदाच घडत आहे असे अजिबात नसून, जेव्हा-जेव्हा सेन्सॉर बोर्डाने एखाद्या सिनेमावर आक्षेप घेतला तेव्हा तेव्हा अशाप्रकारचा रोष व्यक्त केला गेला.

The 'Red Signal' screen shown by Censor board is' | सेक्स सिन्सचा भडीमार असल्यानेच ‘या’ सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने दाखविला रेड सिग्नल

सेक्स सिन्सचा भडीमार असल्यानेच ‘या’ सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने दाखविला रेड सिग्नल

्या सेन्सॉर बोर्डविरुद्ध बॉलिवूड असा काहीसा सामना रंगताना बघावयास मिळत आहे. मात्र असे पहिल्यांदाच घडत आहे असे अजिबात नसून, जेव्हा-जेव्हा सेन्सॉर बोर्डाने एखाद्या सिनेमावर आक्षेप घेतला तेव्हा तेव्हा अशाप्रकारचा रोष व्यक्त केला गेला. सध्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाला सेन्सॉरने रेड सिग्नल दाखविल्याने सिनेमाच्या दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव यांच्यासह निर्माता प्रकाश झा यांनी सेन्सॉरच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सेन्सॉरच्या नियमावलीविषयीही शंका उपस्थित केल्या आहेत. मात्र या सिनेमावर बॅन लावण्याचे नेमके कारण काय याचाच घेतलेला हा आढावा...
   


‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या नावावरूनच हा सिनेमा महिला केंद्रित असेल हे स्पष्ट होते. मात्र सेन्सॉर बोर्डाने बॅनचे कारण स्पष्ट करताना दिलेले दाखले खरोखरच धक्कादायक आहे. सेन्सॉर बोर्डाने म्हटले की, हा सिनेमा लेडी ओरिएंटेड असून, यामध्ये महिलांच्या लाइफपेक्षाही त्यांची फॅँटेसी दाखविण्यात आली आहे. त्याशिवाय सिनेमात सेक्शुअल सिन्सचा जबरदस्त भडीमार केलेला आहे. शिवीगाळ, अश्लील शब्द, आॅडिओ पोर्नोग्राफी आणि समाजाच्या एका कम्युनिटीविषयीचे काही सेन्सेटीव्ह प्रसंगही यात दाखविण्यात आले आहे. 



सिनेमाच्या ट्रेलरमधून ही बाब काहीशी स्पष्टही होते. परंतु सिनेमाच्या निर्माते आणि काही कलाकारांनी सेन्सॉरच्या या निर्णयावरच आक्षेप घेतला आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे हिने म्हटले की, हा एक अवॉर्ड विनिंग सिनेमा आहे. त्यामुळे सीबीएफसी विनाकारणच सिनेमाला सर्टिफिकेट देण्यास नकार देत आहे. अभिनेता शशांक अरोडा याने तर, सीबीएफसीने तिसºयांदा माझ्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तसेच ‘हेच का फ्रिडम आॅफ स्पीच’ असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तर सिनेमाच्या दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव यांनी, ‘सिनेमावर बॅन म्हणजेच महिलांच्या अधिकारावर बॅन’ असे म्हटले आहे. सिनेमात एका छोट्याशा शहरातील चार महिलांची कथा दाखविण्यात आली असून, ज्या आयुष्य जगण्याच्या स्वातंत्र्याचा शोध घेत असतात, त्यात वावगे काय? असेही श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. 



प्रकाश झा यांनी प्रोड्यूस केलेल्या या सिनेमात रत्ना पाठक शाह, विक्रांत मॅसी, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकूर आणि शशांक अरोडा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सध्या सीबीएफसीच्या या निर्णयाविरुद्ध लढा देण्याचे काम सुरू असून, यात विजय कोणाचा होईल, हे बघणे मात्र औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: The 'Red Signal' screen shown by Censor board is'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.