​‘बाहुबली २’ चा प्रदर्शनापूर्वी सर्वाधिक कमाईचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 17:26 IST2017-02-01T11:56:07+5:302017-02-01T17:26:07+5:30

भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वांत मोठा चित्रपट म्हणून नावारुपास आलेल्या ‘बाहुबली’ने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे. बाहुबलीचा दुसरा भाग लवकरच ...

Record of highest earning before 'Bahubali 2' | ​‘बाहुबली २’ चा प्रदर्शनापूर्वी सर्वाधिक कमाईचा विक्रम

​‘बाहुबली २’ चा प्रदर्शनापूर्वी सर्वाधिक कमाईचा विक्रम

रतीय चित्रपट सृष्टीतील सर्वांत मोठा चित्रपट म्हणून नावारुपास आलेल्या ‘बाहुबली’ने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे. बाहुबलीचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बाहुबली’ने अनेक विक्रम मोडीत काढले होते. ‘बाहुबली २’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच एक विक्रम नोंदविला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ५०० कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

एस.एस. राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ हा चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज केला जाणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच प्रदर्शनाच्या अधिकार विक्रीमुळे या चित्रपटाने ५०० कोटींचा गल्ला जमविला असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. ‘बाहुबली २’ हा चित्रपट हिंदीसह तेलगु, तमिळ या तीन भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. हिंदी भाषेत प्रदर्शित होणाºया या चित्रपटाची जबाबदारी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने घेतली आहे, यासाठीच ही रक्कम मोजण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. रमेश बाला यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार ‘बाहुबली- द बिगिनींग’ या चित्रपटाच्या हिंदी भागासाठी १२० कोटी रुपयांना चित्रपटाचे काही हक्क विकण्यात आले होते. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाहुबली’ हा हिंदी भाषेत ध्वनिमुद्रित झालेला आणि बॉक्स आॅफिसवर १०० कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला मिळवणारा पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट ठरला होता. Read More : ‘बाहुबली2’च्या टीमसमोर ‘रिलीज डेट’चे आव्हान!



दरम्यान, ‘बाहुबली २’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ५०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या तमिळ आणि तेलुगू आवृत्तीच्या अमेरिकेतील चित्रपटगृहांचे हक्क आणि उपग्रह हक्कांची विक्री करत इतकी घसघशीत रक्कम कमविण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली- द कन्क्लूजन’मध्ये दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया आणि इतर कलाकार झळकणार आहेत. २८ एप्रिलला हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ALSO READ
 ​‘बाहुबली2’चे ६१३ दिवस आणि शूटींग संपले...!!
​‘बाहुबली २’च्या शूटिंगसाठी व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर

 

Web Title: Record of highest earning before 'Bahubali 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.