​पुन्हा तयार होतोय ‘बाहुबली’... तयारी पूर्ण...! वाचा संपूर्ण बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 15:18 IST2017-12-21T09:48:49+5:302017-12-21T15:18:49+5:30

भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात अनेक विक्रमांवर नाव कोरणारा ‘बाहुबली’ हा सिनेमा पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग ...

Rebuilding 'Bahubali' ... is complete ...! Read the whole news !! | ​पुन्हा तयार होतोय ‘बाहुबली’... तयारी पूर्ण...! वाचा संपूर्ण बातमी!!

​पुन्हा तयार होतोय ‘बाहुबली’... तयारी पूर्ण...! वाचा संपूर्ण बातमी!!

रतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात अनेक विक्रमांवर नाव कोरणारा ‘बाहुबली’ हा सिनेमा पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. होय, ‘बाहुबली’ पुन्हा तयार होतो आहे. फरक इतकाच की, यातील ‘बाहुबली’ ना हिंदी बोलणार, ना तामिळ, ना तेलगू. या चित्रपटातील ‘बाहुबली’ बोलणार ते भोजपुरी. कारण हा चित्रपट भोजपुरी भाषेत तयार होतो आहे. होय, ‘बाहुबली’च्या धर्तीवर साकारल्या जाणा-या भोजपुरीच्या या चित्रपटाचे नाव असेल ‘वीर योद्धा महाबली’. आता या चित्रपटात प्रभासची अर्थात ‘बाहुबली’ची भूमिका कोण साकारणार, ही उत्सुकता तुम्हाला असणारच. तर ही भूमिका साकारणार आहे, भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव निरहुआ.



इकबाल बक्श दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रोमोचे अलीकडे शूट झाले. यात‘बाहुबली’च्या गेटअपमधील निरहुआ अनेक घोडेस्वारांसह शूट करताना दिसला. या भोजपुरी चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, यात अनेक स्पेशल इफेक्ट्स असणार आहेत. भोजपुरीनंतर हा चित्रपट दोन अन्य भाषांमध्येही तयार होऊ शकतो.



येत्या १५ जानेवारीला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरवर लाखो रुपए खर्च केले जात असल्याचे कळते. मुंबईसह राजस्थानच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर चित्रपटाचे शूटींग होणार आहे. यात निरहुआसोबत अभिनेत्री आम्रपाली मुख्य भूमिकेत असेल. भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव निरहुआ याला भोजपुरी इंडस्ट्रीतला सुपरस्टार म्हटले जाते. एकेकाळी दिनेशकडे साधी सायकलही नव्हती. आज तो एका चित्रपटाची ४० ते ५० लाख रुपए फी घेतो. २००३ मध्ये दिनेशचा ‘निरहुआ सटल रहे’ हा म्युझिक अल्बम सुपरडुपर हिट झाला होता. याच अल्बने दिनेशला एका रात्रीत स्टार केले.

ALSO READ : इमरान हाश्मी पडला मागे! ‘हा’ भोजपुरी अभिनेता बनला ‘रिअल सीरिअल किसर’!!

एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’ हे दोन्ही सिनेमे सुपरडुपर हिट ठरले होते. विशेषत: ‘बाहुबली2’ने अभूतपूर्व यश मिळवले होते. 

Web Title: Rebuilding 'Bahubali' ... is complete ...! Read the whole news !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.