​‘बागी’च्या पहिल्या पोस्टरमध्ये ‘विद्रोही’ टायगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 06:27 IST2016-03-02T13:27:51+5:302016-03-02T06:27:51+5:30

अभिनेता टायगर श्राफ याचा २ मार्च म्हणजे वाढदिवस. नेमक्या त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच टायगरच्या आगामी ‘बागी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर ...

'Rebel' tiger in the first poster of 'Baji' | ​‘बागी’च्या पहिल्या पोस्टरमध्ये ‘विद्रोही’ टायगर

​‘बागी’च्या पहिल्या पोस्टरमध्ये ‘विद्रोही’ टायगर

िनेता टायगर श्राफ याचा २ मार्च म्हणजे वाढदिवस. नेमक्या त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच टायगरच्या आगामी ‘बागी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी करण्यात आले. या चित्रपटात टायगर गंभीर व विद्रोही अवतारात दिसेल. पोस्टरमध्ये त्याचा हाच लूक आऊट झालाय. या चित्रपटात श्रद्धा कपूर टायगरची हिरोईन् असणार आहे. श्रद्धानेच टिष्ट्वटरवर चित्रपटाचे पोस्टर जारी करीत, टायगरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माझा आवडता विद्रोही...वाढदिवसाच्या शुभेच्छा टायगर, असा संदेश श्रद्धाने लिहिला आहे. टायगरनेही श्रद्धाचे आभार मानले. निर्देशक सबीर खान यांचा हा चित्रपट एका बंडखोर युवकाची कथा आहे. प्रेमासाठी तो एक मोठी लढाई लढतो. टायगरचा हा दुसरा चित्रपट आहे.

Web Title: 'Rebel' tiger in the first poster of 'Baji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.