...या कारणाने सूरज पंचोली खेळणार नाही ‘होळी’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 13:55 IST2017-03-13T08:25:53+5:302017-03-13T13:55:53+5:30

भारतीय परंपरेत ‘होळी’ हा सण अतिशय महत्त्वपूर्ण समजला जात असून, सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत या सणाची उत्सुकता असते. त्यामुळेच भारतभरातील ...

For this reason, Sun Pir Pancholi will not play 'Holi' !! | ...या कारणाने सूरज पंचोली खेळणार नाही ‘होळी’!!

...या कारणाने सूरज पंचोली खेळणार नाही ‘होळी’!!

रतीय परंपरेत ‘होळी’ हा सण अतिशय महत्त्वपूर्ण समजला जात असून, सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत या सणाची उत्सुकता असते. त्यामुळेच भारतभरातील लोक होळीच्या रंगात रंगून या सणाचा आनंद लुटतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून या सणाने वेगळेच रूप धारण केले असून, सणाचा आनंद घेताना मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली जात आहे. याच कारणाने अभिनेता सूरज पंचोली याने यावर्षी होळी न खेळण्याचा निर्धार करीत ‘पाणी बचाव’चा संदेश दिला आहे. 

यावेळी सूरजने सांगितले की, ‘मी यावर्षी होळी खेळणार नाही. लहानपणी मी रंग उधळत होतो. मात्र आता मला जाणीव झाली की, यात पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असते. देशात पाण्याचे संकट असताना त्यात पाण्याची नासाडी करून भर घातल्यापेक्षा थेंब थेंब वाचवायला हवेत, याच विचाराने मी यावर्षी होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या शनिवारी ‘झी सिने अवॉर्डस्’ सोहळ्यात बोलताना त्याने याबाबतचे मत मांडले. 

पुढे बोलताना सूरज म्हणाला की, माझ्या आगामी सिनेमाची शूटिंग येत्या १५ दिवसांनी सुरू करणार आहे. त्यामुळे होळी खेळून मला चेहरा खराब करायचा नाही. मला चेहºयावर कुठल्याही प्रकारचे डाग नको आहेत. कारण होळीचा रंग एकदा का चेहºयाला लागला की त्याचे डाग सहजासहजी निघत नाहीत. याही कारणाने मी यंदा होळी खेळणार नसल्याचे त्याने सांगितले. 

सूरज या अगोदर २०१५ मध्ये आलेल्या आथिया शेट्टीबरोबर ‘हीरो’ या सिनेमात झळकला होता. मात्र अजूनही तो दमदार भूमिकेच्या शोधात असल्याचेच वेळोवेळी दिसून आले आहे. आता तो आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार असला तरी, त्याने या होळीनिमित्त दिलेला संदेश नक्कीच विचार करायला लावणारा आहे. 

Web Title: For this reason, Sun Pir Pancholi will not play 'Holi' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.