​ या कारणामुळे परदेस फेम महिमा चौधरी आहे बॉलिवूडपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 11:28 IST2017-11-07T05:58:58+5:302017-11-07T11:28:58+5:30

महिमा चौधरीचे खरे नाव रितू चौधरी असून ती मुळची दार्जिलिंगची आहे. इंडस्ट्रीत आल्यानंतर सुभाष घई यांनी तिला नाव बदलण्याचे ...

For this reason, Pardesi is known as Fame Mahima Chaudhary, away from Bollywood | ​ या कारणामुळे परदेस फेम महिमा चौधरी आहे बॉलिवूडपासून दूर

​ या कारणामुळे परदेस फेम महिमा चौधरी आहे बॉलिवूडपासून दूर

िमा चौधरीचे खरे नाव रितू चौधरी असून ती मुळची दार्जिलिंगची आहे. इंडस्ट्रीत आल्यानंतर सुभाष घई यांनी तिला नाव बदलण्याचे सुचवले आणि त्यामुळेच तिने महिमा या नावाने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिला लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने कॉलेज जीवनातच तिने मॉडलिंगला सुरुवात केली होती. तिने अनेक जाहिरातींध्ये काम केले. आमिर खान आणि एेश्वर्या रायसोबत तिने पेप्सीच्या जाहिरातीत काम केले होते. ती अभिनेत्री बनण्यापूर्वी व्हीजे म्हणून काम करत होती. त्याचवेळी सुभाष घई यांनी तिला पाहिले आणि शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या परदेस या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला व्यवसाय केला आणि या चित्रपटसाठी महिमाच्या अभिनयाचे देखील कौतुक करण्यात आले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. त्यानंतर तिने दाग, प्यार कोई खेल नही, धडकन, लज्जा, ओम जय जगदीश यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 
महिमाच्या अनेक भूमिका गाजल्या असून तिला परदेस, धडकन यांसारख्या चित्रपटांसाठी पुरस्कार देखील मिळाले आहेत. महिमा एक खूप चांगली अभिनेत्री असली तरी ती सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करते. चित्रपटात काम न करण्यामागे एक खास कारण असल्याचे महिमा सांगते. महिमाने अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये काम केले असले तरी सध्या तिला चित्रपटांमध्ये काम करण्यात रस नाहीये. याविषयी महिमा सांगते, अभिनेत्रींचे वय एकदा वाढले की, बॉलिवूडमध्ये त्यांना चांगल्या भूमिका मिळत नाहीत असे मला वाटते. त्यामुळे कोणत्याही भूमिका साकारण्यापेक्षा मी चित्रपटांपासून दूर राहाणेच पसंत करते. 
महिमा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली. परदेस या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अपूर्व अग्निहोत्री आणि तिच्या अफेअरची चर्चा झाली होती. त्यानंतर लिएंडर पेससोबतचे तिचे प्रेमप्रकरण तर चांगलेच गाजले होते. तिने २००६ला बॉबी मुखर्जी सोबत लग्न केले. बॉबी हा एक व्यवसायिक असून त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. 

Also Read : महिमाचा दावा : लिएंडरने मला प्रेमात धोका दिला

Web Title: For this reason, Pardesi is known as Fame Mahima Chaudhary, away from Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.