या कारणामुळे इम्तियाज अली झाला शाहरुख खानवर इम्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 18:00 IST2017-03-03T12:00:41+5:302017-03-03T18:00:35+5:30
शाहरुख खानच्या अभिनयावर दिग्दर्शक इम्तियाज अली खूपच प्रभावित झाला आहे. इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपट द रिंग मध्ये आपल्याला शाहरुख ...
.jpg)
या कारणामुळे इम्तियाज अली झाला शाहरुख खानवर इम्प्रेस
ाहरुख खानच्या अभिनयावर दिग्दर्शक इम्तियाज अली खूपच प्रभावित झाला आहे. इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपट द रिंग मध्ये आपल्याला शाहरुख खान दिसणार आहे. शाहरुख खानने अजूनही रंगभूमीशी नाळ जोडून ठेवलेली आहे. मला वाटले नव्हते शाहरुख अजूनही तसाच अभिनय करतो जसा तो दिल्लीत असताना रंगमंचावर करायचा असे इम्तियाज अलीने एका मुलाखतीत म्हटले आहे. इम्तियाज अली आणि शाहरुखनचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट आहे. रिंग चित्रपटातील शाहरुखच्या अभिनयावर इम्तियाज खूपच खूश झाला आहे. याचित्रपटात शाहरुख बरोबर अनुष्का शर्मा ही आपल्याला दिसणार आहे. शाहरुख आणि अनुष्का रब ने बना दी जोडी याचित्रपटात मोठ्या पदड्यावर एकत्र दिसले होते. त्यानंतर ते आता इम्तियाज अलीच्या द रिंग या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. हा चित्रपटाची निमिर्ती शाहरुख खानचे प्रोडक्शन रेड चिलीज एनटरमेंट करते आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख रोज दिल्लीतल्या रंगमंचावरील अनुभव बाबत सतत बोलत असायचा आणि याबाबत इम्तियाज त्याच्यावर इम्प्रेस झाला आहे. एका थिअटर महोत्सवात तो बोलत होता. इम्तियाज अली स्वता: रंगमंचाशी आधीपासून जोडला गेलेला असल्याचे तो म्हणाले रंगभूमीनंतर तो चित्रपटांकडे वळाला. द रिंग या चित्रपटाचे शूटिंग प्रयाग, एमस्टरडॅम आणि बुडापोस्टमध्ये होणार आहे. हा चित्रपट 11 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे.