सिनेमा नाही आवडला म्हणून या अभिनेत्रीला चाहत्याने मारून फेकला होता बूट, पोलिस चौकशीवेळी समोर आले होचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 12:06 IST2020-06-08T12:02:38+5:302020-06-08T12:06:12+5:30

फॅन तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. रसिकांच्या प्रेमामुळेच तमन्ना रुपेरी पडद्याची रानी बनली आहे.

For This Reason Angry fan throw stones On Tamannaah Bhatia | सिनेमा नाही आवडला म्हणून या अभिनेत्रीला चाहत्याने मारून फेकला होता बूट, पोलिस चौकशीवेळी समोर आले होचे कारण

सिनेमा नाही आवडला म्हणून या अभिनेत्रीला चाहत्याने मारून फेकला होता बूट, पोलिस चौकशीवेळी समोर आले होचे कारण

अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा देणारी तमन्ना आता हिंदी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव ठरले आहे. कधी कधी तिची हीच लोकप्रियता तिच्यासाठी अडचणीची ठरते. तिच्या एका फॅननं तिच्यावर बूटही भिरकावला होता. तमन्ना हैदराबादच्या हिमायतनगरमध्ये एका ज्वेलरी शॉपच्या उदघाटनाला गेली होती. त्यावेळी 31 वर्षीय करिमुल्लाने दुकानातून बाहेर येणा-या तमन्नावर बूट भिरकावला. 

तमन्नाभोवती फॅन्सचा गराडा असल्यामुळे तो बूट एका कर्मचा-याला लागला. नारायणगुडा पोलिसांनी करिमुल्लाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी गेल्या काही दिवसांत तमन्नाचे सिनेमा फ्लॉप ठरले. या सिनेमांनी निराशा केल्याने बूट भिरकावल्याचे त्याने चौकशीत कबूल केले. कलाकारांची देवाप्रमाणे पूजा करणारे आणि त्यांना डोक्यावर घेणारे फॅन दक्षिणेत आहेत. मात्र सिनेमा नाही आवडले तर तशी नाराजी व्यक्त करणारे फॅनसुद्धा तिथे आहेत हेच यानिमित्ताने समोर आलं होते. त्यामुळे या फॅनची निराशा होणार नाही यासाठी दक्षिणेचे कलाकार झटत असतात. 

तमन्नाने आजवर रसिकांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही अपवाद वगळल्यास तमन्नाचे सिनेमा सुपरडुपर हिट ठरलेत. त्यामुळेच फॅन तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. रसिकांच्या प्रेमामुळेच तमन्ना रुपेरी पडद्याची रानी बनली आहे.

Web Title: For This Reason Angry fan throw stones On Tamannaah Bhatia