आयर्न मॅन साकारताना धमाल : रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 20:33 IST2016-04-19T15:03:51+5:302016-04-19T20:33:51+5:30

कॅप्टन अमेरिका: सिव्हील वॉर या चित्रपटात आयर्न मॅनची भूमिका साकारलेल्या रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने या चित्रपटाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. ...

Realizing the Iron Man: Robert Downey Jr. | आयर्न मॅन साकारताना धमाल : रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर

आयर्न मॅन साकारताना धमाल : रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर

प्टन अमेरिका: सिव्हील वॉर या चित्रपटात आयर्न मॅनची भूमिका साकारलेल्या रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने या चित्रपटाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. हा चित्रपट करताना त्याच्या काय कल्पना होत्या, चित्रपटात काम करताना त्याने काय अनुभवले, त्याबद्दल त्यानेच सांगितले...
प्रश्न: आयर्न मॅन म्हणून तू या चित्रपटांच्या माध्यमातून समोर आलास. ज्यावेळी तू पहिल्यांदा हे वाचत होता, त्यावेळी तुला अ‍ॅव्हेंजर्स विरुद्ध अ‍ॅव्हेंजर्स ही लढत होईल असे वाटले होते का?
रॉबर्ट: मला माहिती होते. हे सर्व काही माझ्या डोक्यात होतेच. गेली वर्षानुवर्षे हे सुरु आहे. माझ्या मते हे दहावे वर्ष असावे. सिव्हील वॉरची कॉमिक बुक मालिका मला आठवतीय. जर आम्ही खूपच खेचत गेलो तर एकेदिवशी ती तुटू शकते. मला वाटते सारांशाच्या स्वरुपात हे समोर आले नसते. 
प्रश्न: बºयाच वेळा अशा चित्रपटांमधील पात्र तीन तास मेकअपसाठी अगदी सकाळपासून तयारीत बसलेला असतो, अशा भूमिका करण्याकडे कल असतो. तुझ्याबाबतीत असे कधी झालंय का? म्हणजे परत हे नको इतके म्हणेपर्यंत, किंवा याची मजा आलीय?
रॉबर्ट: होय, बºयाचवेळा खूप मजा आली.  मला खात्री आहे, ख्रिस (इव्हान्स) तुला सांगेल तो प्रत्येक भूमिका अगदी खºया अर्थाने जगला आहे. मी सध्या पोस्टर्सवर दिसत असलो तरी ज्यावेळी मी सूट घालायचो, त्यावेळी खूप वेगळे वाटायचे परंतू मला वाटते, जे लोक खरंच सुदैवी असतात ते परिस्थितीला नावे ठेवत असतात. मला तो सूट खूप आवडायचा.
प्रश्न: मला आश्चर्य वाटते की ९ ते १० वर्षाचा रॉबर्ट तुझ्यात दिसतो. तुला मुलाच्या डोळ्यांनी ते पाहता येते का?
रॉबर्ट: मी ते केले आहे आणि लहान मुले सेंट्सला भेट द्यायची. अशा वयाची कामे पूर्वी केली आहेत. माझा मुलगा अ‍ॅक्सेन सेटवर यायचा. तोही आपल्या वडिलांनी केलेल्या कामात गुंतला जायचा. त्याला याचा अर्थ कळू लागलाय.
प्रश्न: खरोखरीच आश्चर्यजनक आहे हे?
रॉबर्ट : अगदी
प्रश्न: तू महान आयर्न मॅनची भूमिका साकारलीय. ख्रिस इव्हान्सला ग्रेट कॅप्टन अमेरिकेबद्दल काय वाटते?
रॉबर्ट: या भूमिकेला दुसरा कोणी न्याय देऊ शकेल असे वाटत नाही. सुपर हिरोज साकारताना तुम्हाला खूप अडचणीतून जावे लागते. मला वाटते, तुमच्या आत्मविश्वासामध्ये नम्रता असली पाहिजे. 
प्रश्न: एक अभिनेता म्हणून तू अशी सलग दृष्ये कशी साकारतोस?
रॉबर्ट: हे अगदी मजेशीर आहे. आयर्न मॅन २ च्या काही दिवसांपूर्वी मी असे म्हणायचो की ही माझी खासगी मालमत्ता आहे, त्यावर शासनाचा काही अधिकार नाही आणि आता वेगळे म्हणतो. कदाचित हा वयाचा फरक असेल. तिशीत किंवा चाळीशीत तुम्ही पाठीमागे वळून बघता, त्यावेळी निर्णय चुकीचा असतो. या चित्रपटाबद्दल अनेकांना श्रेय द्यावे लागेल. जॉन फॅवेरुने आयर्न मॅन चित्रपटाचा सेट अप केला. फर्स्ट अ‍ॅव्हेंजरसाठी जॉश स्वीडन यांना सगळे श्रेय देता येईल. पोलीस चांगले किंवा वाईट नसतात. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ते काम करीत असतात. 
जेव्हा ते टीम म्हणून काम करतात, त्यावेळी टीमच असता. ते (चाहते) नेहमीच वेगळे काही तरी करण्याची अपेक्षा ठेवत असतात. ‘रॅड’ मी न्यूयॉर्कहून आलोय परंतु मी कॅलिफोर्नियाचा आहे.

Web Title: Realizing the Iron Man: Robert Downey Jr.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.