बहुप्रतिक्षीत ‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी रविवारी संपूर्ण कपूर कुटुंबासोबत लंच केले. आई, काका ...
रिअल ‘कपूर अॅण्ड सन्स’
n style="line-height: 18.1818px;">बहुप्रतिक्षीत ‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी रविवारी संपूर्ण कपूर कुटुंबासोबत लंच केले. आई, काका शशी कपूर यांच्यासह संपूर्ण कपूर कुटुंबीयांनी एन्जॉय केलेले हा ‘लन्च इव्हेंट’ खराखुरा ‘कपूर अॅण्ड फॅमिली’ इव्हेंट ठरला. ऋषी कपूर यांनी टिष्ट्वटरवर या लंचचे एक छायाचित्र शेअर केले. वास्तव! रविवारी दुपारी कपूर अॅण्ड फॅमिलीने कधी न संपणारे लंच सोबत घेतले. तुझे स्वागत मॉम. तुम्हाला पाहून आनंद झाला शशि काका! असे टिष्ट्वट ऋषी कपूर यांनी केले. ऋषी कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘कपूर अॅण्ड सन्स’ हा चित्रपट येत्या १८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यात एका कपूर कुटुंबातील सदस्यांची कहानी आहे. यात ऋषी यांनी ९० ते ९९ वर्षांच्या व्यक्तिची भूमिका साकारली आहे. आलिया भट्ट, फवाद खान व सिद्धार्थ मल्होत्राही यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.